Shivsena News : आमचा पक्ष प्रवेश कधी होणार? 'त्या'माजी नगरसेवकांकडून नेत्यांकडे विचारणा!

Shiv Sena Shinde group entry delay : माजी महापौर घोडेले दांम्पत्याने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी इतर पदाधिकारी, माजी नगरसेवकांना रोखण्यासाठी मोहिम हाती घेतली होती.
Shivsena Municipal Corporation News
Shivsena Municipal Corporation NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : महिनाभरापासून चर्चा सुरू असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दहा ते बारा माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश लांबला आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडणार हे स्पष्ट झाल्यानंतर हे सगळे आता त्या पक्षाकडूनही दुर्लक्षित झाले आहेत. आहे तो पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, तर ज्या पक्षात जायचे तो अजून प्रवेश देईना अशा कात्रीत ते माजी नगरसेवक सापडले आहेत.

मनात चलबिचल सुरू झाल्याने या माजी नगरसेवकांनी आता आमचा पक्ष प्रवेश कधी होणार? अशी विचारणा (Shivsena) शिवसेना नेत्यांकडे सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 25 जानेवारी रोजीच्या जालना येथील आभार दौऱ्यात या सर्व माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार होता. परंतु हा मुहूर्त हुकला आणि आता तो बराच लांबला आहे. पक्ष प्रवेश लांबल्यामुळे या सर्व माजी नगरसेवरकांच्या मनात भितीचे वातावरण आहे.

Shivsena Municipal Corporation News
ShivSena UBT : पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी ठाकरेसेनेच्या हालचाली, उद्धव ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर

शिवसेनेतील बहुतांश माजी महापौरांनी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्यानंतर सर्वाधिक चर्चा संभाजीनगर मध्ये सुरू आहे ती या माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाची. माजी महापौर घोडेले दांम्पत्याने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी इतर पदाधिकारी, माजी नगरसेवकांना रोखण्यासाठी मोहिम हाती घेतली होती. खैरेंनी तर शिवसेनेच्या मेळाव्यात साष्टांग दंडवत घालत हात जोडून कोणीही पक्ष सोडून जाऊ नका, अशी भावनिक साद घातली होती.

Shivsena Municipal Corporation News
Uddhav Thackeray : 'स्थानिक' साठी ठाकरे गटाची स्वबळाची तयारी; काँग्रेससह मित्रपक्षांचा सावध पवित्रा

तर अंबादास दानवे यांनी घरोघरी जाऊन भेटी देत पदाधिकारी, माजी नगरसेवकांची मनधरणी केली होती. परंतु यानंतरही हे सगळे माजी नगरसेवक पक्ष सोडून शिंदे गटात जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे अंबादास दानवे यांनी आता कोणालाही रोखणार नाही, ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दरवाजे आपल्यासाठी बंद झाले आहेत, याची जाणीव त्या माजी नगरसेवकांना झाली आहे.

Shivsena Municipal Corporation News
Eknath Shinde On Budget : लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या... : एकनाथ शिंदेंकडून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे अभूतपूर्व स्वागत

मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील अधिकृत प्रवेश अजून झालेला नसल्याने या सगळ्यांच्या मनात भितीचे वातावरण असल्याचे चित्र आहे. यातूनच या सर्वांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांना आमचा पक्ष प्रवेश कधी होणार? अशी विचारणा सुरू केली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगरमध्ये लवकरच आभार दौरा होणार आहे. त्यावेळी या सगळ्या माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश होतील, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com