Ambadas Danve : परदेशातील अभ्यास दौरा संपताच अंबादास दानवे कोणाची शाळा घेणार?

Ambadas Danve Protest for Crop Loan : विदेशातील अभ्यास दौरा संपल्यानंतर परतलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News, 12 June : विदेशातील अभ्यास दौरा संपल्यानंतर परतलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यासह मराठवाड्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असतांना पीक कर्जासाठी मात्र त्यांची बँकांकडून अडवणूक होत आहे.

मागील काही दिवसांपुर्वी अंबादास दानवे यांनी याच मुद्यावर सर्व बँकाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना पंधरा दिवसात पीक कर्जाची संपूर्ण प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दानवे यांनी दिलेली 8 जूनपर्यंतची मुदत संपल्यामुळे विदेश दौऱ्यावरून परतताच अंबादास दानवेंनी बँकांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.

त्यानूसार गुरुवारी (ता. 13 जून) रोजी जिल्ह्यातील सर्व बँकांसमोर शिवसेना (Shivsena) (ठाकरे गट) आंदोलन करणार आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी तसेच शेतीच्या कामासाठी लागणारे पीक कर्ज शेतकऱ्यांना नाकारणाऱ्या बँकांची शिवसैनिक या निमित्त चांगलीच शाळा घेणार असल्याचं बोललं जातं आहे. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर शिवसेनेच्या वतीने जिल्ह्याभरातील बँकेसमोर गुरुवारी सकाळी 11 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यात मान्सूनचा पाऊस चांगल्या प्रकारे झाल्यामुळे खरीप हंगामाची पेरणी करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. मात्र पेरणीसाठी हातात पैसा नसल्याने बहुसंख्य शेतकरी बँकांकडे पीक कर्जासाठी हेलपाटे मारत आहेत. मागील वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक पैसेही नाहीत. शेतकऱ्यांना बँकाकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी बँकाकडे कर्जासाठी अर्ज केले आहेत.

Ambadas Danve
Ravindra Waikar Vs Amol Kirtikar: 'वायकरांचा विजय 'मॅनेज'...'; कुणी केला गंभीर आरोप,न्यायालयाचा दरवाजाही ठोठावणार

मात्र, बँक शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याच्या तसेच मंजुरीसाठी टक्केवारी मागत असल्याच्या अनेक तक्रारी दानवे (Ambadas Danve) यांच्या कार्यालयात आल्या आहेत. या तक्रारीची सत्य परिस्थिती समोर यावी तसेच मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा लीड बँकेच्या बैठकीत 8 जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील पीक कर्ज प्रकरणे शून्य टक्क्यापर्यंत आणण्यासाठी केलेल्या सुचनेवर बँकानी काय कार्यवाही केली, याची माहिती व्हावी या उद्देशाने उद्याचे आंदोलन होणार आहे.

Ambadas Danve
Sunil Tatkare : 'अजित पवारांबरोबर जाऊन भाजपने ब्रँड व्हॅल्यू गमावली', सुनिल तटकरेंनी दिलं चोख उत्तर

मराठवाड्यात पीक कर्ज मिळाले नाही म्हणून काही दिवसापुर्वी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या घटनेनंतर बँका पीक कर्जाच्या बाबतीत गांभीर्याने निर्णय घेतील असे अपेक्षित होते. सीबीलचे कारण पुढे करत बँका शेतकऱ्यांना कर्ज नाकारत असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही बँकेचे मुजोर अधिकारी जुमानत नसल्याने शिवसेना त्यांना हिसका दाखवेल, असा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com