Shivsena Marathwada : पराभव विसरा पण कारणे शोधा; संभाजीनगरात ठाकरे गट विधानसभेच्या तयारीला

Chhatrapati Sambhajinagar Shivsena Uddhav Thackeray Group : राज्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले असले तरी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर मध्ये मात्र महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.
Ambadas Danve, Chandrakant Khaire
Ambadas Danve, Chandrakant KhaireSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News, 15 June : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. राज्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले असले तरी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर मध्ये मात्र महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.

निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्व्हेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे विजय होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष मतदान आणि त्यानंतरच्या मतमोजणीनंतर खैरे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये मराठा उमेदवार देण्याची केलेली खेळी प्रचंड यशस्वी ठरली.

मराठवाड्यातील आठ पैकी सात लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली, मात्र संभाजीनगरमध्ये महायुतीचे संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) विजयी झाले. चंद्रकांत खैरे यांचा सलग दुसरा पराभव झाल्याने ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला. मराठा समाजाने यावेळी एकजूट दाखवत संदिपान भुमरे यांना एकगठ्ठा मतदान दिले. तर खैरे यांची मदार फक्त ओबीसी मतांवर होती.

यातही शिवसेनेतील (Shivsena) मराठा नेत्यांनी चंद्रकांत खैरे यांचे काम केले नसल्याचा आरोप केला जातो. सलग दुसरा पराभव झाल्यामुळे कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आता ठाकरे गटाच्या ताब्यातून गेला आहे. याची सल नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत शिवसेनेचे संपर्क नेते विनोद घोसाळकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

Ambadas Danve, Chandrakant Khaire
Video Mahayuti News : थेट स्ट्राइक रेट सांगत शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा मोठा दावा; भाजप नव्हे तर महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा निश्चितच जिव्हारी लागणारा आहे. या पराभवाची कारणे शोधा मात्र पराभव झाला म्हणून खचून न जाता बसून राहू नका. आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेला झालेला पराभव विसरून नव्या दमाने कामाला लागा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) वातावरणामुळेच चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला होता. हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणात झालेले विभाजन एमआयएमच्या पथ्यावर पडल्यामुळे इम्तियाज जलील निवडून आले होते. 2024 च्या निवडणुकीत मराठवाडा आणि काही प्रमाणात राज्यातही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनाचा प्रभाव दिसला.

मराठवाड्यात सरकार विरोधातील रोष मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देत व्यक्त केला. मात्र संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ त्याला अपवाद ठरला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यात कन्नड विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे आमदार आहेत.

त्यामुळे संदिपान भुमरे यांना शहरातील पूर्व आणि मध्य मतदारसंघ वगळता ग्रामीण भागातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले. ठाकरे गटाचे एकनिष्ठ आमदार कन्नडचे उदयसिंह राजपूत यांच्या मतदारसंघातही भुमरे यांनाच मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला जिल्ह्यात कमबॅक करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

Ambadas Danve, Chandrakant Khaire
Ajit Pawar : लोकसभा निकालानंतर अजितदादांचे आमदार अलर्ट! अधिवेशनात 'हॉट इश्यू' लावून धरणार...

याशिवाय अंतर्गत गटबाजीचे लागलेले ग्रहण ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते कसे सोडवतात? यावरही विधानसभा निवडणुकीत यश अवलंबून असणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व नव्याने शिवसेना नेतेपदी बढती मिळालेले अंबादास दानवे यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोघांनाही मातोश्रीवर बोलावून समज दिली होती.

मात्र प्रत्यक्षात या दोघांमधील संबंध अजूनही सुधारलेले नाहीत हे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांना इथे लक्ष घालावे लागणार असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com