Shiv Sena Parbhani : पाथरी मतदारसंघावर दावा करत मुख्यमंत्री सईद खान यांना बळ देणार ?

Shivsena Claim Pathri Constituency : मुख्यमंत्री शिंदेच खान यांना ताकद देत असल्याने दुर्राणी यांच्या अडचणी भविष्यात वाढणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेणार असल्याचे सांगितल्याने भाजप इच्छूकांच्या पोटात गोळा उठला आहे.
CM Eknath Shinde- Sayeed Khan Parbhani
CM Eknath Shinde- Sayeed Khan ParbhaniSarkarnama
Published on
Updated on

Pathri Assembly Constituency : जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. परभणी शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश झाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी महायुतीत भाजपकडे असलेल्या पाथरी मतदारसंघावर दावा सांगत सईद खान यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

पाथरीची जागा शिवसेनेसाठी सोडवून घेऊ असे, आश्वासन शिंदे यांनी या मतदारंसघातून पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे महादेव जानकर परभणी मतदारसंघातून पराभूत झाले. ठाकरे गटाचे संजय जाधव हे सलग तिसऱ्यांदा या मतदार संघातून निवडून आले. लोकसभेला अपयश आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नेत्यांना बळ देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

याचाच एक भाग म्हणून पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन इथे जम बसवण्याचा त्यांच्या प्रयत्न आहे. सईद खान यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात शिंदे गटाकडे अल्पसंख्याक समाजाच ओढा वाढला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे महत्वाचे मानले जात आहे. सईद खान यांनी गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीचे माजी आमदार व नेते बाबाजानी दुर्राणी यांना शह देत पाथरीत आपले वर्चस्व निर्माण केले.

CM Eknath Shinde- Sayeed Khan Parbhani
CM Eknath Shinde-Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांवर विश्वास दाखवला, प्रासंगिक करार कायम राहणार ?

सईद खान यांचा मतदारसंघातील वाढता प्रभाव पाहता दुर्राणी यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र आता मुख्यमंत्री शिंदेच खान यांना ताकद देत असल्याने दुर्राणी यांच्या अडचणी भविष्यात वाढणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे (Shivsena) घेणार असल्याचे सांगितल्याने भाजप इच्छूकांच्या पोटात गोळा उठला आहे.

सध्या हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. सुरेश वरपूडकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या मोहन फड यांचा सतरा हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे.

CM Eknath Shinde- Sayeed Khan Parbhani
Shivsena News : नागपूरमधील 'तो' मतदारसंघ शिंदेसेनेला, भाजपने दावा सोडला?

यावेळी नव्यानेच पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी पाथरी विधानसभा शिवसेनेला सोडण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडून घेणार असल्याचे आश्वासन दिले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघाची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात पाथरी विधानसभा मतदारसंघ असेल का ? याची उत्सूकता सगळ्यांना असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com