Shivsena Beed
Shivsena BeedSarkarnama

पाच नगर पंचायतीत शिवसेनेची डरकाळी घुमणार?

जिल्ह्यात केज, वडवणी, शिरुर कासार, पाटोदा आणि आष्टी या पाच नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. (Marathwada)
Published on

बीड : जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. (Beed) राज्यातील सत्तेत महाविकास आघाडीचा मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेची (Shivsena) डरकाळी घुमणार का? हे आता लवकरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे पाच पैकी तीन नगर पंचायतींच्या कार्यक्षेत्रात पक्षाला जिल्हाप्रमुखच नसल्याने कर्णधाराविना पक्षाला मैदानात उतरायचे (Marathwada) असल्याने पक्षासमोर मोठे आव्हान असणार आहे.

जिल्ह्यात केज, वडवणी, शिरुर कासार, पाटोदा आणि आष्टी या पाच नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. इतर पक्षांप्रमाणे शिवसेनेच्याही बैठका सुरु आहेत. संपर्क नेत्यांच्या चकरा वाढल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेना कोणासोबत आघाडी करणार हे गुलदस्त्यातच आहे.

राज्यात महाविकास आघाडी असली तरी जिल्ह्यातले राजकीय समिकरण वेगळे आहे. त्यात पक्षाला मागच्या काही वर्षांत जनसामान्यांना जोडता आलेले नाही. वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांकडून खुशमश्करी करुन घेण्यात दंग राहीले तर पदाधिकारी पक्ष व पदांच्या आडून आपापल्या व्यवसायांत दंग. खुद्द पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखांनीच संपर्कप्रमुखांसमक्ष तसा आरोप केला होता.

त्यामुळे पक्षवाढ केवळ कागदी अहवालापुरती आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता सर्वांचेच बॅलेन्सशिट पक्षाला कळणार आहे. दरम्यान, काही महिन्यांपुर्वी केज, माजलगाव व परळी मतदार संघासाठी अप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड झालेली आहे. आता त्यांच्या कार्यक्षेत्रातील केज व वडवणी या दोन नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत.

चेहरा आणि आरसा लवकरच समोर येणार असल्याने त्यांची चांगलीच कसाोटी लागली आहे. तर, आष्टी, पाटोदा आणि शिरुर कासार या निवडणुक असलेल्या तीन नगर पंचायतींच्या कार्यक्षेत्रासाठी पक्षाला जिल्हाप्रमुखच नाही. गुटखा साठा पकडल्याच्या प्रकरणात तत्कालिन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आरोपींच्या यादीत आल्यानंतर त्यांच्या पदाला पक्षाने स्थिगिती दीली आहे.

Shivsena Beed
भाजप आमदाराचा नगर परिषद प्रभाग रचेनेवर आक्षेप ; सीईओची निवडणूक आयोगाकडे तक्रार

त्यामुळे सध्या कॅप्टनविना मॅचची तयारी सुरु आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी पक्षाकडे लाॅबींग सुरु आहे. मात्र, निवड देखील पक्षाने अद्याप थंड बस्त्यात ठेवली आहे. तसे दोन कप्तान असतानाही जिल्ह्यात पक्षाला फारसे झेंडे मिरवता आलेले नाहीत. त्यामुळे एक नसल्यानंतर तर काय, असा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com