Kannad Assembly Constituency: कन्नडमध्ये शिवसेनेचा `धनुष्यबाण` संजना जाधव यांच्या हाती, निशाणा `दानवे` साधणार!

Shivsena Shinde vs Shivsena UBT: शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना या मतदारसंघात होत असला तरी येथील एक वैशिष्ट्य म्हणजे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव हे दोघे पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
Kannad Assembly Constituency 2024
Kannad Assembly Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या कन्नड मतदार संघात भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

पक्षप्रवेश होताच संजना जाधव यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाले तेव्हा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एकमेव कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले होते.

तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना कन्नड (Kannad) ची जागा ताब्यात घ्यायची आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी संदिपान भुमरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी कन्नड विधानसभेची जबाबदारी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवली होती. आता थेट भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्येला पक्षप्रवेश देत एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी देत मास्टर स्ट्रोक लगावल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना या मतदारसंघात होत असला तरी येथील एक वैशिष्ट्य म्हणजे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव हे दोघे पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसली तरी संजना जाधव यांच्या उमेदवारीनंतर ते अपक्ष लढण्याची दाट शक्यता आहे. संजना व हर्षवर्धन जाधव हे विभक्त पती-पत्नी आहेत.

Kannad Assembly Constituency 2024
Kannad Assembly Constituency 2024 : कन्नडमध्ये ठाकरेंचा उमेदवार मैदानात, आता लक्ष महायुतीकडे

एकनाथ शिंदे यांनी संजना जाधव यांना शिवसेनेत प्रवेश देत एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जाते. संजना जाधव यांच्या उमेदवारीमुळे कन्नडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांची ताकद संजना जाधव यांच्या पाठीशी असणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उदयसिंह राजपूत यांना महायुतीसह अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीचा सामना करावा लागणार आहे.

रावसाहेब दानवे यांनी कन्या संजना जाधव यांना शिवसेनेत पाठवून धनुष्यबाणाच्या माध्यमातून हर्षवर्धन जाधव यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रावसाहेब दानवे यांनी केलेली ही खेळी यशस्वी ठरते का? की मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमदार उदयसिंह राजपूत दुसऱ्यांदा जागा राखण्यात यशस्वी होतात?

हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2019 च्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव पराभूत झाल्यामुळे गेल्या काही काळापासून ते राजकारणापासून अलिप्त आहेत.

Kannad Assembly Constituency 2024
Shivsena UBT Candidate list : उद्धव ठाकरेंनी मोठं धाडस दाखवलं, तिसरी उमेदवार यादी जाहीर; 'या' मतदारसंघात दिला मुस्लिम चेहरा

कौटुंबिक आणि आर्थिक अशा दोन्हीही परिस्थितीशी दोन हात करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधात कसा लढा देतात? यावर कन्नड विधानसभा मतदारसंघातील विजयाचे गणित ठरणार आहे.

कन्नड मतदारसंघात जाधव घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. दिवंगत रायभान जाधव यांनी या मतदारसंघातून काँग्रेस आणि अपक्ष म्हणून तीन वेळा विजय मिळवला होता. तर 2009 आणि 2014 अशा सलग दोन निवडणुकीत अनुक्रमे मनसे आणि शिवसेनेडून हर्षवर्धन जाधव या मतदारसंघातून निवडून आले होते.

संजना जाधव या जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून मतदारसंघात कार्यरत होत्या. शिवसेनेची उमेदवारी संजना जाधव यांना विधानसभेत एन्ट्री मिळवून देणारी ठरणार का? हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर स्पष्ट होईल. तुर्तास कन्नडमध्ये तिरंगी लढत होणार असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com