परभणी : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. हा वाद ताजा असतानाच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनीही ''छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते'' असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. परभणीत OBC आरक्षण बचाव कृती समिती तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
'' माझी मराठा समाजाला विनंती आहे, छत्रपती शाहु महाराजांनी पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलं होतं, ते मराठा समाजाचे होते. मराठ्यांना आरक्षण होतं, मग त्यांचं आरक्षण का गेलं, छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते, ते कुळवाडीभूषण राजा होते. पण त्यावेळच्या काही तथाकथित मोठ्या लोकांना आरक्षण नको होते. पण आज काय अवस्था झाली ते पहा," असे महादेव जानकर यांनी केले.
दरम्यान, १३ डिसेंबरपासून ओबीसी आरक्षणासाठी ( OBC Reservation ) गंगाखेडमध्ये विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या वतीने एल्गार आंदोलन सुरुआहे. या आंदोलनास सोमवारी महादेव जानकर यांनी भेट दिली. यावेळी आंदोलकांना संबोधित करताना ते म्हणाले की, माझी सर्वसामान्य लोकांना विनंती आहे की, आमचे ३०-३५ आमदार निवडून येऊ द्या, मग दहा मिनिटांत ओबीसींची किंमत काय आहे ते दाखवून देतो. मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देतो. मुस्लिम समाजावरही किती अन्याय झालायं, गॅरेज, अंड्याचे दुकान, कोंबडीचे दुकान पाहिले की तेथे मुस्लिम असतात. या लोकांचा कुठेही डाटा नाही. हिंदू भिकारी आणि मुस्लिमही भिकारी. राज्य चालविणारा तर तिसराच मालक असतो. असेही जानकरांनी म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर छत्रपती शाहू महाराजांनी देशात जे पहिले आरक्षण दिले ते मराठा समाजाला दिले. पण नंतर मराठ्यांचे आरक्षण गेले. छत्रपती शिवाजी महाराज हेही ओबीसी होते, ते कुळवाडीभूषण राजे होते. पण त्यावेळीच्या काही तथाकथित लोकांनी आरक्षण नाकारले, पण आज काय अवस्था झाली ते पहा, असेही जानकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.