Parli Agricultural Festival : परळीतील पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे शिवराजसिंह चौहान करणार उद्घाटन!

State Agriculture Minister Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने होणाऱ्या महोत्सवाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Parli Agricultural Festival
Parli Agricultural FestivalSarkarnama
Published on
Updated on

Parli Agricultural Festival News : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या 21 ऑगस्ट पासून जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

राज्याचे कृषिमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या या कृषी महोत्सवात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोध, विविध आधुनिक उपकरणे, शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने यांची माहिती खरेदी करता यावे या दृष्टीने महोत्सव अत्यंत महत्त्वाचा व शेतकऱ्यांना लाभदायक असून, या महोत्सवाचे उद्घाटन 21 ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान(Shivraj Singh Chauhan), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

Parli Agricultural Festival
Beed News : "निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना नोकरींच्या आमिषाचा क्षीरसागरांचा जुनाच फंडा"

या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने विविध आधुनिक यंत्र सामुग्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, नवनवीन संशोधन, चर्चासत्रे तसेच विविध उत्पादने, पशूंच्या विविध प्रजाती यांसह अनेक अर्थांनी हा महोत्सव महत्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान, कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी परळीत अधिकाऱ्यांच्या समवेत कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, कृषी विभागाचे सह संचालक दिवेकर, मोटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, वाल्मिक अण्णा कराड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांसह कृषी, महसूल पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

Parli Agricultural Festival
Governoer Haribhau Bagde : `माझा तिहेरी सत्कार` हरिभाऊ बागडेंनी इच्छुकांना काढला चिमटा..

धनंजय मुंडे यांनी या अधिकाऱ्यांसमवेत कृषी महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या परळी शहरातील बाजार समितीच्या मैदानावर सुरू असलेल्या संपूर्ण तयारीची पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेला मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेले शेकडो स्टॉल्स, पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था, सुरक्षा आदी सर्व बाबींची पाहणी करून सर्व व्यवस्थापन चोखपणे करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com