Shivsena News: सात-सात रुपये वर्गणी करून निवडून आणले, याची तरी जाण ठेवायची..

Sushma Andhare : कॉलेजमध्ये कारकून असलेल्या चौगुलेंना शिवसेनेने उमेदवारी दिली. लोकांनी नोट आणि वोट दिले.
Sushma Andhare News, Umarga
Sushma Andhare News, UmargaSarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : गरिब गरिब म्हणुन निवडणुकीसाठी सामान्य माणसाने सात, सात रुपये लोकवर्गणी करून आमदार ज्ञानराज चौगुले यांना निवडून आणले. Shivsena पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली संधी आणि लोकांच्या प्रेमामुळे त्यांनी हॅट्रीकही साधली. तरीही त्यांनी शेवटी दगाबाजी केल्याने डोक्यावर घेऊन नाचणारे लोकच आता तुम्हाला आपटतील, येणाऱ्या निवडणूकीत निष्ठावंत शिवसैनिक आणि तमाम मतदार ही किमया करून दाखवतील, असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांना दिला.

Sushma Andhare News, Umarga
Marathwada News : साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे; चव्हाण, पंकजाही येणार..

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त सोमवारी (ता. पाच) उमरगा (Marathwada) येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. मनसेने ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिल्यामुळे सगळ्यांचे लक्ष अंधारे यांच्या भाषणाकडे लागले होते.

अंधारे म्हणाल्या, कॉलेजमध्ये कारकून असलेल्या चौगुलेंना शिवसेनेने उमेदवारी दिली. लोकांनी नोट आणि वोट दिले. लोकवर्गणीच्या शिल्लक रक्कमेतुन फिरायला गाडी सुद्धा दिली. पण त्यांनी लोकांच्या मताचा अनादार करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना हा विचार आहे, तो कधीही संपणारा नाही.

भाजपला महाराष्ट्र अस्थिर करून सत्ता उपभोगायची असून, त्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची येथील महापुरुषांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्यावर थेट मात्र अंधारे यांनी थेट टिका करण्याचे टाळले. त्यामुळे सभास्थळी कुजबुज सुरू होती.

या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, हो ते राहिलेच उस्मानाबादच्या (Osmanabad) सभेत ते होऊन जाईल, असे म्हणत वेळ मारून नेली. दरम्यान आमदार चौगुले यांच्यावर उपस्थित खासदार, आमदारांनीही टिका टाळल्याचे पहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com