Grampanchayt Election : भुमरेंच्या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे गट भिडणार..
Sandipan Bhumre News : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटातील मंत्री, आमदार दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या समोर जात आहेत. Sandipan Bhumre पहिल्या टप्यातील निवडणुकीत रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांनी आपल्या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती राखल्या होत्या. परंतु खरा कस त्यांचा दुसऱ्या टप्यात लागणार आहे.
तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी येत्या १८ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून यावेळी ठाकरे विरुद्ध शिंदेसेनेचे थेट सामना होण्याची शक्यता आहे. (Paithan) एकनाथ शिंदे यांच्या बंडात भुमरे हिरारीने सहभागी झाल्यापासून ठाकरे गट त्यांच्यावर तुटून पडला आहे. (Shivsena) पैठण मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा एकदा नव्हे तर दोनदा काढली.
त्यानंतर सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा देखील होवून गेली. या सगळ्याच नेत्यांनी भुमरे यांच्यावर टीकेचा भडीमार करत पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशेब मागितला होता. ग्रामंपचायत निवडणुकीच्या निमित्ताने भुमरे यांना धडा शिकवण्याची संधी ठाकरे गटाला चालून आली आहे. तर पहिल्या टप्यात बंडानंतर देखील भुमरेंनी मतदारसंघावर आपली पकड मजबुत असल्याचे सहा ग्रामपंचायती जिंकून दाखवून दिले होते.
आता २२ ग्रामंपचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. मंत्र्यांचा तालुका म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांचे देखील या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष असल्याचे बोलले जाते. तर उद्धवसेनेकडून तालुकाप्रमुख मनोज पेरे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व इतर पदाधिकारी बळ देत आहेत.
त्यामुळे ग्रामंपचायत निवडणुकीतील जय-पराजयावर आगामी जिल्हा परिषद व त्यानंतर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. दोन्ही गटांनी आपली ताकद लावलेली असतांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काॅंग्रेस, मनसे, व सत्ताधारी भाजपने देखील जोर लावला आहे.
ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे व त्यांच्या समर्थकांना पक्षात प्रवेश देत धक्का दिला आहे. या पक्ष प्रवेशाचा ठाकरे गटाला ग्रामंपचायत निवडणुकीत काही फायदा होतो का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.