Shivsena : खोतकर म्हणतात, शिंदे, दानवेंची दिल्लीतील भेट हा तर योगायोग..

खोतकर हे शिंदे यांच्यासोबत गेले हे दिसते आहे, पंरतु ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय घोषणा करायची नाही, असे खोतकर यांनी बहुदा ठरवले असावे. (Arjun Khotkar)
Shivsena Leader Arjun Khotkar News
Shivsena Leader Arjun Khotkar NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : नुकतेच शिवसेनेत उपनेते पद मिळालेले आणि आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात जोरदार भाषण ठोकणारे माजी आमदार अर्जून खोतकर आज (Dehli) दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत दिसले. त्यानंतर खोतकर हे देखील शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चांना उधाण आले. खोतकर यांनी मात्र दिल्लीत आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासोबत झालेली भेट हा योगायोग असल्याचा दावा केला आहे.

आपण अजूनही शिवसेनेतच आहोत, शिवसेनेतच राहणार का? यावर आपण नंतर बोलू असे म्हणत सस्पेंस कायम ठेवला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपशविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुखमंत्री आज दिल्लीत होते. याचवेळी अर्जून खोतकर दिल्लीत पोहचले आणि त्यांनी शिंदे, (Eknath Shinde) दानवे यांची भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र खुद्द रावसाहेब दानवे यांनीच व्हायरल केल्यानंतर खोतकर हे देखील शिंदे गटात सहभागी झाल्याच्या बातम्या पसरल्या.

दरम्यान, अर्जून खोतकर यांचा मोबाईल देखील नाॅटरिचेबल होता. आता खोतकर यांनी आपल्या या भेटीबद्दल दिल्लीत प्रसाार माध्यमांना प्रतिक्रिया देत आपली भेट हा योगायोग असल्याचा दावा केला आहे. अर्जून खोतकर म्हणाले, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आलो होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राष्ट्रपती महोदयांचा शपथविधी असल्याने दिल्लीतच असल्याने मी त्यांची भेट घेतली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील तेव्हा तिथे उपस्थित होते. ही भेट म्हणजे योगायोग आहे, मी अजूनही शिवसेनेतच आहे. भेट झाली की चर्चा तर होणारच, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. मात्र शिवसेनेतच राहणार का ? या प्रश्नावर मात्र खोतकर म्हणाले, याबद्दल मी नंतर बोलतो. एकूणच खोतकर यांची शिंदे व भाजपच्या नेत्यांशी बोलणी सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते.

Shivsena Leader Arjun Khotkar News
Shiv Sena : अर्जुन खोतकरांचाही ठाकरेंना चकवा; दिल्लीत शिंदे गटात झाले सामील?

खोतकर हे शिंदे यांच्यासोबत गेले हे दिसते आहे, पंरतु ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय घोषणा करायची नाही, असे खोतकर यांनी बहुदा ठरवले असावे. त्यामुळेच या भेटीला ते योगायोग ठरवत आहेत. दोन दिवसांपुर्वीच आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद मोहिमेत अर्जून खोतकर यांनी औरंगाबादेत जोरदार भाषण करत गद्दारांविरोधात आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना शस्त्र उचलावे लागतील.

महाभारतात अर्जूनला जसा प्रश्न पडला होता की आपल्या भावांविरुद्ध आपण शस्त्र उचलावे का? असाच प्रश्न आजच्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पडला असावा, असे म्हणत कायम शिवसेनेसोबत राहण्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर खोतकरांनी शिंदे व दानवेंची दिल्लीत घेतलेली भेट पाहता आता ठाकरे-पिता पुत्रांनी कुणाविरुद्ध शस्त्र उचलावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com