Shivsena News : 'लॅन्ड रोव्हर, डिफेंडर अलिशान गाड्यातून शिरसाट-भुमरे-गायकवाडांचा थाट! पण मालक वेगळेच

Shivsena Leaders Car Controversy : राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांच्या निवडणूक शपथपत्रांवर नजर टाकील तर त्यात आपल्याकडे कार नसल्याचा उल्लेख असतो. अर्थात हे कोणालाही न पटण्यासारखे आहे.
Shivsena Leaders Car Controversy News
Shivsena Leaders Car Controversy NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. शिवसेना नेते संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि संजय गायकवाड हे महागड्या कारमधून फिरताना दिसल्याने चर्चा रंगल्या आहेत.

  2. मात्र त्या गाडीचा मालक वेगळाच असल्याचं उघड झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

  3. विरोधकांनी या प्रकरणावरून पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत नेत्यांवर टीका सुरू केली आहे.

Chhatrapti Sambhajinagar : राजकीय नेत्यांचे राहणीमान, त्यांच्या जवळ असलेल्या महागड्या गाड्यांचे कलेक्शन, त्यांचे कपडे, गाॅगल, बूट याची चर्चा नेहमीच होत असते. सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेयं ती शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री वापरत असलेल्या महागड्या अलिशान गाड्यांची. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे वापरत असलेल्या लॅन्ड रोव्हर, डिफेंडरचे कौतुक त्यांच्या समर्थकांना, चाहत्यांना नक्कीच आहे. पण ज्या चकचकीत गाड्यांमधून हे नेते राज्यभरात फिरतात त्या दुसऱ्याच्या नावावर असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांच्या निवडणूक शपथपत्रांवर नजर टाकील तर त्यात आपल्याकडे कार नसल्याचा उल्लेख असतो. अर्थात हे कोणालाही न पटण्यासारखे असले तरी शपथपत्रावर विश्वास ठेवावाच लागतो. तर या चर्चेचे कारण म्हणजे शिवसेनेचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी ओळख असलेले संजय शिरसाट (Sanjay Shirsat) जग्वार लॅन्ड रोव्हर ही गाडी वापरतात. या महागड्या गाडीचा कार क्रमांक MH-20 GE-0001 असल्याचे सांगितले जाते. ही सागर सदाशिव पवार यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याही थाटात अलिशान गाडी भर घालते. कार क्रमांक MH-20 GK 0009 ही संजय रमेशलाल भंडारी यांच्या नावे नोंद आहे. गाडी एकाच्या मालकीची आणि ती दारात मात्र दुसऱ्याच्याच असा हा सगळा गोलमाल आहे. बुलडाण्याचे वादग्रस्त शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची डिफेंडर कार देखील कंत्राटदार निलेश ढवळे यांच्या नावे असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या गाड्यांवर आमदारांचे स्टिकर असल्याचेही दिसून येते.

Shivsena Leaders Car Controversy News
Sanjay Shirsat : मर्सिडीजमधून फिरणारे संजय शिरसाट शेतकऱ्यांचे नुकसान पाहण्यासाठी ट्रॅक्टरने बांधावर गेले!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी यावरून शिरसाट-भुमरे यांच्यावर थेट नाव घेत दावा केला आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या महागड्या गाड्या ह्या कंत्राटदारांच्या नावावर असतात. भुमरे, शिरसाट यांची नावेही कंत्राटदारांच्या नावावरच आहेत. माझ्याकडे त्यांची नावे देखील आहेत. एकनाथ शिंदे यांना हा प्रकार माहित नसेल असे नाही, असेही दानवे यांनी म्हटले आहे. यापुर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा अशाच प्रकारचा आरोप आणि दावा मंत्री संजय शिरसाट वापरत असलेल्या कोट्यावधीच्या कारबद्दल केला होता.

Shivsena Leaders Car Controversy News
Sandipan Bhumre News : दीडशे कोटींची जमीन गिफ्ट मिळालेल्या संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाचे बोलावणे!

राजकारणी आणि कंत्राटदारांच नेमक काय नातं असतं? कारण उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी ज्यांना कंत्राटदारी करायची असेल तर त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांना राजकारण करायचे त्यांनी कंत्राटदारी सोडून द्यावी, असा सल्ला एका जाहीर कार्यक्रमातून दिला होता. एकूणच अजिदादांचा हा सल्ला, अंबादास दानवे यांचा आरोप पाहता मंत्री, नेत्यांच्या महागड्या गाड्यांची चर्चा तर होणारच.

FAQs

1. शिवसेना नेते कोणत्या कारमुळे चर्चेत आले?
→ एका महागड्या लक्झरी कारमध्ये संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि संजय गायकवाड फिरताना दिसल्याने वाद निर्माण झाला.

2. त्या कारचा मालक कोण आहे?
→ अधिकृत तपशील जाहीर नाही, परंतु ती कार खास व्यावसायिकाच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे.

3. या घटनेमुळे काय राजकीय परिणाम झाले?
→ विरोधकांनी नेत्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले असून, सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू आहे.

4. संबंधित नेत्यांनी प्रतिक्रिया दिली का?
→ काही नेत्यांनी ही फक्त अफवा असल्याचं सांगून प्रकरणाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

5. पुढील कारवाईची शक्यता आहे का?
→ अधिकृत चौकशीची मागणी अद्याप झालेली नाही, परंतु सोशल मीडियावरील दबाव वाढतोय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com