Dhananjay Sawant : 'माझ्या जीवाला काही झाल्यास पोलिस जबाबदार'; धनंजय सावंत फडणवीस अन् शिंदेंची भेट घेणार

Dhananjay Sawant Police Allegations : 'तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग करू' अशा धमकीवर माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची पहिली प्रतिक्रिया.
Dhananjay Sawant
Dhananjay SawantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. बेदम मारहाण करून सरपंच देशमुख यांची हत्या झाली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

अशीच हत्या करण्याची धमकी धाराशिवचे जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना आली. या धमकीवर धनंजय सावंत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

धनंजय सावंत हे धाराशिवचे शिवसेनेचे (Shivsena) नेते माजी मंत्री आमदार तान्हाजी सावंत यांचे पुतणे आहे. धनंजय सावंत धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहे. या धमकीप्रकरणी ते लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.

Dhananjay Sawant
Nilesh Lanke : '...तर राजीनामा देईल'; खासदार नीलेश लंके भर बैठकीत असं का म्हणाले?

धनंजय सावंत यांनी म्हटले आहे की, "विधानसभा निवडणुकीपूर्वी माझ्या घरासमोर गोळीबार झाला होता. त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास, याला सर्वस्वी पोलिसात जबाबदार असतील. यातच आता पुन्हा धमकी आली आहे. या झालेल्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे". या घटना मुद्दाम कोणी करत आहे का? याचा शोध घेतला पाहिजे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

Dhananjay Sawant
Top 10 News : मुंबई पुन्हा ताब्यात घेण्यासाठी 'प्लॅनिंग' सुरू; ही' आघाडी बाहेर पडून जाणार महायुतीत - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत या दोघांना एक धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. ही चिठ्ठी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर ड्रायव्हरमार्फत बंद पाकिटातून 100 रुपयांच्या नोटेसोबत देण्यात आली. यावर धनंजय सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

सुपारीच असू शकते...

"या धमकीवर पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, हा तपास पादर्शक व्हावा. गेल्यावेळी गोळीबार झाला होता. त्याचा तपास अजून झालेला नाही. धमकीची दुसरी घटना आहे. याबाबत फडणवीस आणि शिंदेसाहेबांचे लक्ष वेधणार आहे. धमकीबरोबर आलेली शंभर रुपयाची नोट येणे म्हणजे, ही सुपारी देखील असू शकते", अशी भीती देखील धनंजय सावंत यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com