Shivsena : सगळ्यात जास्त फंड, तरीही बंड ? छोटे ठाकरे भुमरेंवर संतापले..

पर्यटनासाठी सर्वात जास्त फंड मी भुमरेंच्या पैठणमध्ये दिला आहे. ते नेहमी माझ्या केबिनमध्ये यायचे दादा या कामासाठी निधी हवा आहे, ही कामे करायची आहेत. मी कधीही नाही म्हणालो नाही. (Aditya Thackeray)
Minister Aditya Thackeray - Sandipan Bhumre
Minister Aditya Thackeray - Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचा जेवढा धक्का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना बसला, त्यापेक्षा अधिक धक्का त्यांना या बंडात सहभागी झालेल्या काही मंत्री आणि आमदारांच्या नावामुळे बसला आहे. यापैकीच एक नाव म्हणजे राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री तथा पैठणचे (Paithan) आमदार संदीपान भुमरे यांचे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदारसंघात बंडखोरांचा समाचार घेण्यासाठी एक भाषण केले. या भाषणात त्यांनी शिंदे यांच्यासोबत गेलेल्या मंत्री आमदारांचा समाचार घेतांना संदीपान भुमरे यांचा विशेष उल्लेख केला. (Shivsena) संदीपान भुमरे हे पाचवेळा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भुमरेंना मंत्री केसे केले याचा किस्साच त्यांनी जाहीरपणे सांगितला.

आदित्य ठाकरे म्हणाले, मी पैठणच्या दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा एक शेतकरी माझ्या समोर आले आणि मला म्हणाले साहेब, आमचे भुमरे पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना आता मंत्री करा, मी म्हणालो चला मंत्री करतो, मुंबईत जाऊन लगेच उद्धव साहेबांशी बोलतो. त्यानंतर तो शेतकरी म्हणाला, पण राज्यमंत्री नाही तर कॅबिनेट मंत्री करा, मी म्हणालो, हरकत नाही, तेही साहेबांशी बोलतो.

Minister Aditya Thackeray - Sandipan Bhumre
Aurangabad : अब्दुल सत्तार म्हणतात, एकनाथ शिंदेमुळे शिवसेनेत, त्यांच्यासोबतच राहणार..

नंतर आणखीन एक व्यक्ती म्हणाले, त्यांना हे खाते द्या, तेव्हा मी म्हणालो, ते तर आम्हाला ठरवू द्या. निधी मिळत नाही, कामे होत नाही असं भुमरे आता सांगत आहेत. मी जेव्हा माहिती घेतली तर पर्यटनासाठी सर्वात जास्त फंड मी भुमरेंच्या पैठणमध्ये दिला आहे. ते नेहमी माझ्या केबिनमध्ये यायचे दादा या कामासाठी निधी हवा आहे, ही कामे करायची आहेत.

मी कधीही नाही म्हणालो नाही, त्यांना सातत्याने फंड देत राहिलो. औरंगाबादेत मी सर्वाधिक फंड दिला आहे. मग असे असतांना भुमरे कोणत्या तोंडाने आमची कामे होत नाही, निधी मिळत नाही हे सांगत आहेत, असा जाबा देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com