आपल्याविरोधात मुंदडांनी पैसे वाटले! हेमंत पाटलांच्या आरोपाने शिवसेनेत खळबळ

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
Hemant Patil And Jaiprakash Mundada
Hemant Patil And Jaiprakash Mundada

हिंगोली : शिवसेनेतील (ShivSena) अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना रसद पुरवल्याचा आरोप रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर आहे. आता हिंगोलीतील शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा (Jaiprakash Mundada) यांच्यावर थेट आरोप केला आहे. आपल्याला पाडण्यासाठी त्यांना मतदारांना पैसे वाटल्याचा दावा त्यांनी जाहीरपणे केला आहे.

मुंडदा हे शिवसेनेचे माजी मंत्री असल्याने त्यांच्यावरच आरोप करण्यात आल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. नाईलाजास्तव दोन वर्षांनी मी हे बोलायला सुरूवात केल्याचे सांगत हेमंत पाटील म्हणाले, आमच्यातील काही गद्दार परपक्षातील आमदारांना धरून शिवसैनिकांना बघून घेऊ, अशा जाहीर धमक्या देत आहेत. माझ्या निवडणुकीत जयप्रकाश मुंदडा, त्यांचे चिरंजीव, भाऊ हे सर्वत्र शिवसेनेला निवडणुकीत मतदान करू नका सांगत जाहीररीत्या पैसे वाटत होते.

Hemant Patil And Jaiprakash Mundada
गृहखातं कसं असतं?, असं जयंत पाटलांनी विचारलं अन् आबांनी अशी टाकली गुगली...

याच निवडणुकीत नाही तर यापूर्वीच्या निवडणुकीतही सुभाष वानखेडे उमेदवार होते. शिवसेनेचा उमेदवार फक्त 1200 मतांनी पडलेला आहे. सर्व शिवसैनिकांच्या जिव्हारी बाण लागलेला आहे. शिवाजीराव माने यांच्यावेळीही याच तंत्राचा वापर करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही जाती-धर्माचे राजकारण केलेले नाही. पण आता जातीचे राजकारण केले जात आहे. कोण कुठून आलाय, असं राजकारण केले जात आहे. राजकारण त्यांनी सुरू केलं आहे. नाईलाजास्तव मी दोन वर्षांनी बोलत आहे, असं हेमंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Hemant Patil And Jaiprakash Mundada
रामदास कदमांचा पत्ता विधान परिषदेतूनही होणार कट!

राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांनाही शिवसेना नेते जयप्रकाश मुंदडा रसद पुरवत असल्याचा आरोप केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार, आमदारांसह सर्व पदाधिकारी लवकरच याबाबतचे पुरावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून देणार असल्याचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सांगितले.

हेमंत पाटील यांच्यासह इतर आमदारांनी केलेल्या या आरोपामुळे हिंगोलीतील राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच शिवसेनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. या आरोपांबाबत जयप्रकाश मुंदडा यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. आता ते काय भूमिका घेणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com