Shivsena News : इम्तियाज जलील यांचे नेतृत्व चांगले ; ठाकरे गटाच्या नेत्याकडूनच कौतुक

Ambadas Danve News : मुंबईत माध्यमांशी बोलताना दानवे यांनी MIM च्या 'इंडिया' आघाडीतील समावेशाच्या प्रस्तावावर भाष्य केले.
Shivsena News
Shivsena NewsSarkarnama

Marathwada Political News : एमआयएम (MIM) हा जातीयवादी, घटनेला न मानणारा, कलम 370 ला विरोध करणारा आणि देशाच्या कायद्यापेक्षा शरियतला मोठा मानणारा पक्ष आहे. (Shivsena News) त्यामुळे या पक्षाला 'इंडिया' आघाडीत घेणे कदापी शक्य नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खासदार इम्तियाज जलील यांचा 'इंडिया' आघाडीत घेण्याचा प्रस्ताव धुडकावला.

Shivsena News
AIMIM Maharashtra News : `एमआयएम` ला महाराष्ट्रात दुसरा भिडू मिळेना..

दुसरीकडे एमआयएममध्ये जे काही नेतृत्व आहे, त्यात इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचे नेतृत्व चांगले आहे, त्यामुळे त्यांना राजकारणात काही करून दाखवयाची इच्छा असले तर त्यांनी एमआयएम (AIMIM) सोडून काँग्रेस, किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करावा, असा सल्लाही दानवे यांनी दिला. ज्या इम्तियाज जलील यांच्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला तडे गेले. चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला, त्याच इम्तियाज जलील यांचे नेतृत्व चांगले असल्याचे कौतुक अंबादास दानवे यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला दानवे यांनाही जबाबदार धरले जाते. स्वतः खैरे यांनी तसा आरोप केला होता. (Marathwada) त्यानंतर आता दानवेंकडून इम्तियाज यांचे कौतुक झाल्याने खैरे-दानवे यांच्यातील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून खैरे-दानवे यांच्या रस्सीखेच सुरू आहे. मी दहा वर्षांपासून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगत दानवे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर चंद्रकांत खैरे यांनी, इच्छा व्यक्त करणे आणि मनासारखे घडले नाही की विरोधात काम करणे योग्य नाही, असा टोला दानवेंना लगावला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता इम्तियाज जलील यांनी एमआयएमचाचा 'इंडिया' आघाडीत समावेश करावा, अशी मागणी केली होती. त्यावर अंबादास दानवे यांनी, इम्तियाज यांचे नेतृत्व चांगले असल्याचे म्हणत खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे बोलले जात आहे.

इम्तियाज जलील यांना 'इंडिया' आघाडीत यायचे असेल तर त्यांनी 'एमआयएम' सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा, असे दानवे यांनी सूचवले आहे. अंबादास दानवे ज्या संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले आहेत त्या निवडणुकीत त्यांनी एमआयएमची मते घेतली होती, असा आरोप तेव्हा शिवसेनेवर करण्यात आला होता. विधान परिषदेवर जाण्यासाठी एमआयएमची मदत घेणाऱ्या दानवे यांनी इम्तियाज यांचे कौतुक केल्याने पुन्हा एकदा पडद्यामागच्या त्यांच्या मैत्रीची चर्चा रंगू लागली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Shivsena News
Ambadas Danve News : लोकसभेची उमेदवारी दानवेंना की खैरेंना, दानवे म्हणतात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com