Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये आवाज कोणाचा... तर शिवसेनाचा, हा नारा पूर्वी गल्ली गल्लीत घुमत होता. मात्र, आता हे चित्र बदललेआहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि भाजपची वाढलेली ताकद यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपल्या बाल्लेकिल्ल्यात कोणाला उमेदवारी देणार, यावरून मोठी चर्चा होते आहे. चंद्रकांत खैरे मागील निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्यांनी आपली या मतदारसंघावरील दावेदारी सोडलेली नाही. त्यातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यानी देखील आपली भूमिका स्पष्ट केली असल्याने उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे.
मी उमेदवारी मागणार नाही. मात्र, पक्षाने आदेश दिला तरच मैदानात उतरून लढणार, असे सांगत अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. शिवसेना फुटल्यानंतर त्याचा मराठवाड्यात फटका बसणार नाही, असा अंदाज व्यक्त गेला होता. मात्र, मराठवाड्यातील आमदार मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यावेळीही माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे उद्धव ठाकरेंसोबत राहिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2019 च्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यामुळे मतांची फाटफूट झाल्याचा फटका चंद्रकांत खैरे यांना बसला. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून आले. वंचितची देखील एमआयएमला मोठी साथ मिळाली. चंद्रकांत खैरे निवडणुकीनंतर काहीसे बाजूला पडले होते. मात्र, बंडानंतर शिवसेना पुन्हा सक्रिय होत आपण उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचे सांगितले.
चंद्रकांत खैरे यांचे वय पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नाही, याविषयी उद्धव ठाकरे गटात एकमत नाही. आपला जुना मतदार कायम ठेवायचा असेल तर खैरेंना उमेदवारी मिळायला हवी, असे एका गटाचे मत आहे. त्यातच काँग्रेसने देखील छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे येथून कोणता उमेदवार देणार आणि भाजप विरोधात लढण्याची तयारी कोण दाखवणार, याचीच चर्चा आहे. त्यात अंबादास दानवे यांनी पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढण्याचे संकेत देत इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढवली आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.