Shivsena News : शिरसाट-भुमरे `अ‍ॅक्शन` मोडवर ; ठाकरे गटावर चढवतायेत जोरदार हल्ला..

MLA Shirsat-Bhumre News : ठाकरे गटाला अंगावर घेऊन चर्चेत राहण्याची स्पर्धाच शिरसाट-भुमरे यांच्यात लागली आहे.
Shivsena News
Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोराने वाहू लागले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर दोन्ही बाजूंनी गेल्या वर्षभरात एकमेकांचे चांगलेच वस्त्रहरण केले गेले. (Shivsena News) गद्दार, खोके, हिंदुत्वाला तिलांजली देणारे अशी विशेषणं दोन्ही बाजूंनी वापरली गेली. नव्या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्षाला अधिक धार येणार आहे.

Shivsena News
Shivsena News : 'त्या' दुर्घटनेत शिरसाट-दानवेंचे जुळले सूर; दोघांनीही केली एकच मागणी

निवडणूकीचे वर्ष असल्याने स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर तोफ डागायला सुरूवात केली आहे. इकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट, (Sanjay Shirsat) रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हेही अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. सेल संपलेला रिमोट कंट्रोल अशा शब्दात शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे.

तर ठाकरे-राऊत यांना स्वप्नातही आमचे सरकार आणि ते पडणार असल्याचा तारखा दिसत असल्याचा टोला संदीपान भुमरे यांनी लगावला आहे. (Shivsena) गेली २५-३० वर्ष शिवसेनेत राजकारण करून पाचवेळा आमदार, दोनवेळा मंत्रीपद मिळवलेले भुमरे ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे या नेत्यांवरही जोरदार हल्ला चढवतांना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरसाट यांच्यावर प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याची अधिकृत जबाबदारीच आहे. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याचा राग ते ठाकरे गटावर काढतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात केली जाते. लोकसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 11 जानेवारी रोजी मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी विरोधकांना विशेषतः ठाकरे गटाला अंगावर घेऊन चर्चेत राहण्याची स्पर्धाच शिरसाट-भुमरे यांच्यात लागली आहे. जिल्ह्यातील शिंदे गटाचे दुसरे मंत्री अब्दुल सत्तार मात्र सध्या या वादापासून चार हात लांब असल्याचे चित्र आहे.

Shivsena News
Sanjay Shirsat News : "महायुतीला लोकसभेच्या 45 जागा जिंकणं अवघड नाही, राज ठाकरे..." शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

एरव्ही सत्तार माध्यामांसमोर बोलायला उत्सूक असतात, पण अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सत्ते एन्ट्री झाली आणि सत्तारांचे कृषीमंत्री पद गेले. अल्पसंख्याक विकास व पणन खात्याचा पदभार त्यांना देण्यात आला असला तरी ते त्याबाबत फारसे समाधानी नाहीत. त्यामुळे सत्तार यांची भूमिका सध्या आपण भले आणि आपला मतदारसंघ भला, अशी दिसते.

Edited By : Jagdish Pansare

Shivsena News
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : 'त्यांना' झोपेतही सरकार पडल्याचे दिसते; शिंदे गटाकडून खिल्ली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com