Shivsena : राज ठाकरेंना ऐकायला लोक येतात, पण मत देत नाहीत..

महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे ६० पैकी २७ नगरसेवक निवडून आले होते. तेव्हापासून शिवसेनेचा भगवा कायम फडकत आला आहे. (Chandrakant Khaire)
Chandrakant Khaire-Raj Thackeray
Chandrakant Khaire-Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा घेण्याची घोषणा पुण्यात केली. (Aurangabad) त्यानंतर शहरातील राजकारण तापायला लागलयं. शिवसेनेने या सभेवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ऐकायला लोक येतात, त्यांच्या नकला पहायला येतात, पण मत कुणीच देत नाही, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज ठाकरे यांच्या सभेने शिवसेनेला (Shivsena) काहीच फरक पडणार नसल्याचे म्हटले आहे.

पुण्यात हनुमान जयंती निमित्त महाआरती व हनुमान चालीसा पठण केल्यानंतर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दोन मोठ्या घोषणा केल्या. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी ते औरंगाबादेत जाहीर सभा घेणार आहेत. तर दुसरी घोषणा जूनमध्ये ते आयोध्येत जाणार आहेत, याची माहिती त्यांनी दिली. या घोषणेनंतर औरंगाबादेत राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेने देखील यावर आपले मत व्यक्त करत राज ठाकरे यांना सभा घेण्यासाठी कुणी तरी मदत करत असल्याचा आरोप करत भाजपकडे बोट दाखवले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या विषयी बोलतांना सांगितले की, राज ठाकरे यांना जनाधार नाही, लोक त्यांना ऐकायला गर्दी करतात, त्यांनी केलेल्या इतरांच्या नकला पाहून टाळ्या, शिट्या वाजवतात, पण प्रत्यक्ष मतदान करायची वेळ आली की पाठ फिरवतात.

माझ्या विरोधात तेव्हा मनसेत असलेले सुभाष पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यासाठी राज ठाकरेंची प्रचंड जाहीर सभा झाली, पण प्रत्यक्षात पाटील यांनी जिल्ह्यातून फक्त १७ हजार मते मिळाली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या जिल्ह्यात शिवसेना कायम सत्तेत राहिली आहे.

Chandrakant Khaire-Raj Thackeray
MNS : मुंबई, ठाण्यानंतर राज ठाकरेंची तोफ आता औरंगाबादेत धडाडणार..

महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे ६० पैकी २७ नगरसेवक निवडून आले होते. तेव्हापासून शिवसेनेचा भगवा कायम फडकत आला आहे. म्हणूनच कदाचित राज ठाकरे यांनी औरंगाबादवर लक्ष केंद्रित करून सभा घेण्यासाठी या शहराला निवडले असेल, असेही खैरे म्हणाले. बाळासाहेबांच्या सभेला लाखोंची गर्दी जमायची, लोक पावसात व चिखलात बसून सभा ऐकायचे. आता खुर्च्या टाकून देखील मैदान भरत नाही, असा दावा देखील खैरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com