संतोष बांगर चिडले : विनायक राऊतांनी काय काय उकळलं.. याचा हिशोब सांगितला....

Santosh Bangar|Shivsena : म्हणून तेव्हा माझे गुरू नाईकांनी थोरातांना रात्री बारा वाजता रेस्ट हाऊसमध्ये बंद केलं होतं..
MLS Santosh Bangar & Baban Thorat, Hingoli Shivsena Latest News
MLS Santosh Bangar & Baban Thorat, Hingoli Shivsena Latest News Sarkarnama

हिंगोली : मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो खोट बोलणार नाही. या शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरातांना हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामधून तीन ते चार वेळा काढलं आहे. यांची आदत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) साहेबांना सुद्धा माहित असून हा खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांचा दलाल आहे. हे पैसे घेऊन जिल्ह्यात पद नियुक्या करत आहे. यामुळेच माझे गुरू आशोकरावजी नाईकांनी थोरातांना रात्री बारा वाजता रेस्ट हाऊसमध्ये बंद केलं होत,असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे हिंगोली-कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केला आहे. (MLS Santosh Bangar & Baban Thorat, Hingoli Shivsena Latest News)

MLS Santosh Bangar & Baban Thorat, Hingoli Shivsena Latest News
त्यांचं नाव मी घेणार नाही, नाहीतर ते माझं वय काढतील; आदित्य ठाकरेंचा केसरकरांना टोला...

आमदार संतोष बांगर म्हणाले, "मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. खोट बोलणार नाही या बबन थोरातांना हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामधून तीन ते चार वेळा काढलं. यांची आदत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा माहित आहे की, हा कोणत्या पद्धतीचा माणूस आहे. हा दलाल माणूस आहे. हा खासदार विनायक राऊत यांचा दलाल आहे. याच थोरातने विनायक राऊतांच्या वाढदिवसांसाठी १ हजार लोकांच्या जेवणाचा खर्च माझ्याकडून घेतला आहे. तर १ लाखांचं क्रिकेट सामन्याचं बक्षिसही घेतलं. तसेच थोरात मला म्हणले की, तुम्हाला जर पुन्हा आमदार व्हायचं असेल तर विनायक राऊतांना तुम्हाला चांगलं गिफ्ट द्यावं लागेल. त्या दिवशी जे हिंगोलीचे खासदार हेंमत पाटलांनी सांगितलं ते काही खोट नाही. जी सोन्याची चैन त्यांनी माझ्याकडून घेतली ती मी राऊतांच्या गळ्यात घातली. मात्र ज्यावेळी मी त्याच्यासोबत फोटो घालत होतो. त्यावेळेस याच थोरातांनी फोटो काढू दिला नाही", असा घणाघात बांगर यांनी थोरात आणि खासदार राऊतांवर केला आहे.

पुढे बांगर म्हणाले, हिंगोलीचा जिल्हाप्रमुख हा संतोष बांगर आहे. आणि आता जे जिल्हाप्रमुख म्हणून रेसमध्ये आणलेले चेलेचपाटे आणले आहेत. मात्र आठ दिवसात हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर हा संतोष बांगर नाव बदलेल,असे थेट आव्हानही बांगरांनी शिवसेनेला दिले आहे.

MLS Santosh Bangar & Baban Thorat, Hingoli Shivsena Latest News
ठाकरेंच कोणतं गुपित एकनाथ शिंदेंकडे आहे की ज्यामुळे भूकंप होईल?

बांगरांनी जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरातांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, आता जिल्ह्यात घोडोबाजार सुरू झाला असून थोरात सवयीप्रमाणे याला जवळ तर त्याला दूर करायचं काम करत आहेत. तसेच पैसे घेऊन कुणाला संपर्कप्रमुख, जिल्हा प्रमुख, तालूका प्रमुख तर कुणाला शहर प्रमुख करायचं काम करत आहेत.

माझे गुरू आशोकरावजी नाईक यांनी या थोरातला यामुळेच रात्री बारा वाजता रेस्ट हाऊसमध्ये बंद करून टाकलं होत. तेव्हा थोरात मला फोन करत होते की नाईक साहेबांना सांगा. मात्र, तेव्हा नाईक साहेबांचं काही चुकलं नव्हतं. हे थोरात दलाल माणुस आहे. हे जिथे जातात तिथे ते गटबाजी करतात. नंदूरबारला त्यांनी पैसे घेऊन जिल्हाप्रमुख म्हणून नेमणुक केली. तर बाळापूर, सेनगाव, वारंगा, हिंगोलीमध्येही पैसे घेऊन नेमणुक केली जात आहे, असा थेट आरोप बांगरांनी थोरातांवर केला.

MLS Santosh Bangar & Baban Thorat, Hingoli Shivsena Latest News
आण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा; आग्रही मागणी घेवून रामदास आठवले घेणार PM मोदींची भेट

दरम्यान, शिवसेनेत 40 आमदार आणि 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे अधिक जोमाने शिवसेना बांधणीच्या कामाला लागले असून त्यांनी अनेक शिवसैनिकांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या असून अनेक ठिकाणी खांदेपालट केली आहे. यामध्ये हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या जागी बबनराव थोरात यांची निवड शिवसेना संपर्कप्रमुख पदी करण्यात आली आहे. त्यांनी जोमाने पदाधिकारी नेमणुक सुरू केल्याने बांगर कमालीचे चिडले आहेत. तर आज हिंगोलीत शिवसेने सोबत गद्दारी केलेल्या गद्दारांच्या गाड्या फोडण्याचे चिथावणीखोर आवाहन थोरात यांनी केल्याने हिंगोलीतील वातावरण अजूनच तापले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com