Lok Sabha Election 2024 : संभाजीनगर शिंदेंकडेच, 'मामां'च्या नावावर शिक्कामोर्तब; भाजप काय भूमिका घेणार?

Sambhajinagar Lok Sabha Constituency : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड अतुल सावे यांची नावे संभाजीनगरमधून चर्चेत असताना शिंदेंचा उमेदवार ठरला आहे.
amit shah eknath shinde
amit shah eknath shindesarkarnama

Chhatrapati Shivajinagar : शिवसेना शिंदे गटाने अखेर छत्रपती संभाजीनगरची जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवलेच. शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी संभाजीनगरवर कुठलीच तडजोड न करण्याचं धोरण स्वीकारले आणि भाजपने हट्ट सोडला. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare ) यांचे नाव संभाजीनगरमधून निश्चित झाल्यानंतर भाजपमध्ये नाराजी पसरली आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ), अतुल सावे ( Atul Save ) यांची नावे चर्चेत असताना आणि गेल्या अडीच वर्षांपासून भाजपने इथे लोकसभेच्या दृष्टीने बांधणी केलेली होती. त्यात आता हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे गेला आहे. या निर्णयाने भाजप नाराज, तर शिवसेना ठाकरे गट जोशात असल्याचे चित्र आहे. संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare ) लोकसभेचे उमेदवार राहिले, तर ठाकरे गटासाठी ही लढत सोपी होईल, असा दावा केला जातोय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकतर भुमरे ज्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तो जालना लोकसभेमध्ये येतो. त्यामुळे आपल्या मतदारांचे मत येणाऱ्या लोकसभेत भुमरे यांना मिळणार नाही. दुसरीकडे गेल्या दोन-अडीच वर्षांत जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी भुमरे यांना टार्गेट करत त्यांच्याविरोधात रान उठवले होते. लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) त्यात आघाडीवर होते. "मी मंदिरे उभारली, दारूची दुकाने नाही," असे सांगत खैरेंनी भुमरेंना लक्ष्य केले होते.

एवढेच नाही तर आदित्य ठाकरे, संजय राऊत ( Sanjay Raut ), सुषमा अंधारे यांनी भुमरेंना त्यांच्याच पैठणमध्ये जाऊन तुम्ही तीस वर्षांत पैठणाचा काय विकास केला? साधे रस्त्यावर दिवे तरी लावले का? असे म्हणत त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरच प्रश्न उपस्थित केला. भुमरे हे पैठण विधानसभा मतदार संघातून सहा वेळा विधानसभा लढले. त्यापैकी पाच वेळा ते विजयी झाले. शिवाय ग्रामपंचायत, नगरपरिषद, साखर कारखाने, जिल्हा परिषद, सोसायट्या अशा सगळ्याच निवडणुकीत त्यांची सत्ता आहे.

amit shah eknath shinde
Chhatrapati Sambhajinagar Constituency: मराठ्यांनो...वज्रमूठ बांधा, निवडणूक ताब्यात घ्या, हीच श्रींची इच्छा!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा बँक, दूध संघातही त्यांच्या दबदबा आहे. परंतु, हे फक्त विधानसभा मतदारसंघात. आता लोकसभेचा उमेदवार म्हणून त्यांना याचा फारसा उपयोग होणार नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या दीड-दोन वर्षांत संघटनात्मक पातळीवर काहीच काम झालेले नाही, याचा फटका भुमरे यांना बसू शकतो. अजूनही बूथस्तरापर्यंतची रचना आणि कार्यकर्त्यांचे जाळे हे ठाकरे गटाकडेच आहे. 13 मे रोजी मतदान असताना आता ऐनवेळी शिंदे गट कमी वेळात तयारी कशी करणार हा मोठा प्रश्न आहे.

दुसरीकडे लोकसभेची जागा आपल्यालाच मिळणार, या आत्मविश्वासात असलेल्या भाजपने केलेली शतप्रतिशत तयारी ते भुमरेंसाठी कितपत राबवतील? याबद्दल शंका आहे. शिंदे गटाने हट्टाने ही जागा भाजपकडून सोडवून घेतली असली तरी त्याचे विजयात रूपांतर करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना करावे लागणार आहे. भाजप भुमरेंचे काम तन-मन-धन ने करणार का? हा मोठा प्रश्न असेल. सद्यःस्थितीत भुमरेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार असली तरी युतीतील घटक पक्षच त्यांना निवडणुकीत 'मामा' करण्याची शक्यता नाकारता येत नाही.


( Edited By : Akshay Sabale )

R

amit shah eknath shinde
Chhatrapati Sambhajinagar News : ठाकरे गटातील नाराजी नाट्य थांबेना, दानवे-खैरेंचे सूर जुळले असतानाच आता...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com