Shivsena : निष्ठेची मशाल घेऊन परिवर्तन करूच ; जैस्वालांना उद्धवसेनेचा इशारा..

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल हे मध्य मतदारसंघातून एमआयएमचा पराभव करून निवडून आले होते. (Opposition Leader Ambadas Danve)
Mla Ambadas Danve- Pradip Jaiswal News, Aurangabad
Mla Ambadas Danve- Pradip Jaiswal News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने शहर आणि जिल्ह्यात निष्ठा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. काल (Aurangabad) औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात ही निष्ठा यात्रा काढण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांच्या मोठ्या गर्दीत निष्ठा यात्रा निघाली. निष्ठेची मशाल घेऊन आम्ही मध्य मतदारसंघात परिवर्तन घडवूच, असा इशारा दानवे यांनी विद्यमान (Pradip Jaiswal) आमदार प्रदीप जैस्वाल यांना दिला.

राज्यातील आणि जिल्ह्यातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावा देखील दानवे यांनी यावेळी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता (Shivsena) शिवसेनेकडून शहरात निष्ठा यात्रेच्या माध्यमातून नव्याने मिळालेले मशाल हे चिन्ह घराघरात पोहचवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. शहरातील विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच वार्डावार्डात देखील ही निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे.

यावेळी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले, राज्यातील जनता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात हेच वातावरण पहायला मिळते आहे. या जोरावर राज्यात आम्ही पुन्हा सत्ता आणू. निष्ठेची मशाल घेऊन आम्ही जिल्हा, मराठवाडा आणि राज्यात निश्चितच परिवर्तन घडवू.

मध्य विधानसभा मतदारसंघात देखील हे परिवर्तन तुम्हाला पहायला मिळेल, असा इशारा देखील दानवे यांनी शिंदेसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना दिला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल हे मध्य मतदारसंघातून एमआयएमचा पराभव करून निवडून आले होते.

Mla Ambadas Danve- Pradip Jaiswal News, Aurangabad
'ये बहुत गलत हुआ है' : भाजपच्या माघारीच्या निर्णयावर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते संतप्त

परंतु शिंदेंच्या बंडात सहभागी होत त्यांनी गद्दारी केली. येणाऱ्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून जैस्वालांना पराभूत करून मशाल पेटवण्याचा निर्धार या निष्ठा यात्रेच्या निमित्ताने करण्यात आल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com