Shivsena UBT News : 'नकली संतान' टीका झोंबली; ठाकरेंची तळपायाची आग मस्तकात; मोदींचे थेट संस्कारच काढले...

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : पाऊण तासाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांचा रोख फक्त मोदी यांच्यावरच होता. महाराष्ट्रात महायुतीला अडचणीचा ठरू पाहत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा काढत ठाकरेंनी मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
Uddhav Thackeray - Narendra Modi
Uddhav Thackeray - Narendra ModiSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : नकली शिवसेना,नकली राष्ट्रवादी अशी टीका केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नकली संतान म्हणत हल्ला चढवला. नकली शिवसेना ही टीका सहन करणाऱ्या ठाकरेंना नकली संतान म्हणत पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा खालच्या पातळीवर जाऊन केलेली वैयक्तिक टीका जिव्हारी लागली. उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारी झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या सभेत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा कडक शब्दात समाचार घेतला.

माझ्यावर बाळासाहेब ठाकरे, मॉ साहेबांचे संस्कार आहेत. मी तुमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू शकत नाही. तुम्ही खूप वर्षापुर्वी घर सोडून बाहेर पडल्यामुळे कदाचित तुमच्या आई-वडिलांना तुमच्यावर संस्कार करायला वेळ मिळाले नसले, म्हणून तुम्ही मला नकली संतान म्हणत आहात. आधी आमदार फोडायचे, मग पक्ष अन् चिन्ह चोरायचे वर पुन्हा आम्हालाच नकली म्हणायचे, हा तुमचा रडीचा डाव महाराष्ट्रातील जनता कदापी खपवून घेणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray - Narendra Modi
MNS-Shivsena News : 'मनसे आणि दोनशे, उठ दुपारी- सुपारी..; शिवसेना ठाकरे अन मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने..

तुम्ही देशात नोटबंदी केली होती, आम्ही महाराष्ट्रात नाणीबंदी करू, भाजप मोदी नावाचे जे नाणं देशात चालवू पहात आहे, ते आम्ही चालू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. पाऊण तासाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांचा रोख फक्त मोदी यांच्यावरच होता. महाराष्ट्रात महायुतीला अडचणीचा ठरू पाहत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा काढत ठाकरेंनी मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

केजरीवालांना प्रचारापासून रोखण्यासाठी बहुमताच्या जोरावर न्यायालयाचे निकाल तुम्ही बदलता, तसं मराठा (Maratha) आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही? असा सवाल करत ठाकरे यांनी अंतरवाली सराटीतील लाठीहल्ला आणि गोळीबार प्रकरणावरून महायुतीला कोंडीत पकडले. जालना आणि संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र सभा आयोजित करण्यात आल्या होत्या, परंतु ढगाळ वातावरण आणि वाऱ्यामुळे ठाकरे यांना जालन्याची सभा रद्द करावी लागली.

Uddhav Thackeray - Narendra Modi
Loksabha Election 2024 : लंकेंच्या दमबाजीवर सुप्रियांनी अजितदादांना सुनावले; ...त्यांनी घरात दमदाटी करावी

पण संभाजीनगरच्या सभेतून त्यांनी महाविकास (Maha Vikas) आघाडीचे कल्याण काळे यांच्यासाठीही आवाहन केले. महायुतीवर टीका करणाऱ्या ठाकरेंच्या निशाण्यावर एमआयएम नव्हती याचेही अनेकांना आश्चर्य वाटले. महाविकास आघाडीमुळे ठाकरेंची शिवसेना यावेळी मुस्लिम मतदारांना साद घालत आहे. अशावेळी एमआयएमवर टीका करतांना मुस्लिम मतदार दुखावले जाऊ नयेत, याची काळजी ठाकरेंनी घेतल्याचे दिसले.

Uddhav Thackeray - Narendra Modi
PDCC Bank Case : PDCC बॅंक मॅनेजरवरील कारवाई ही निव्वळ धूळफेक, ‘ते’ फुटेज सार्वजनिक करा; रोहित पवार आक्रमक

संभाजीनगरात महायुती-महाविकास आघाडी आणि एमआयएम अशी तिरंगी लढत आहे. पण ठाकरेंनी आपल्या संपुर्ण भाषणात एमआयएम, इम्तियाज जलील यांचा उल्लेख टाळला. ठाकरेंच्या निशाण्यावर होते ते नकली संतान म्हणून वैयक्तिक टीका करणारे नरेंद्र मोदी. माझा महाराष्ट्र मोदीजी तुम्हाला दिल्ली पाहू देणार नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Uddhav Thackeray - Narendra Modi
Sharad Pawar News : ....तर हिंदुस्थानची लोकशाही धोक्यात; पवारांनी व्यक्त केली भीती!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com