Loksabha Election 2024 : लंकेंच्या दमबाजीवर सुप्रियांनी अजितदादांना सुनावले; ...त्यांनी घरात दमदाटी करावी

Supriya Sule सुप्रिया सुळे म्हणाल्या, नीलेश लंकेंना दमबाजी करणाऱ्यांनी घरात दमबाजी करावी. लंकेंना दमदाटी केल्यास सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील.
Ajit Pawar, Supriya Sule, Nilesh Lanke
Ajit Pawar, Supriya Sule, Nilesh Lankesarkarnama

Nagar News : अजितदादांनी नीलेश लंके यांना केलेल्या दमदाटीवरून सुप्रिसा सुळे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. "लंकेंना दमदाटी करणाऱ्यांना घरात दमदाटी करावी. हे ज्यांना घाबरतात, त्यांच्यासमोर आम्ही दिल्ली भाषण करतो", असा टोला सुप्रिया सुळेंनी अजितदादांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखेंसाठी नगर दक्षिण मतदारसंघात दोन सभा घेतल्या. पारनेरमधील अजितदादांची सभा चांगलीच गाजली. अजितदादांनी नीलेश लंकेंना त्यांच्याच होमग्राऊंडवर दम भरला. अजितदादांनी गेल्या तीन दिवसात दोन आमदारांना दम भरला आहे. परंतु नीलेश लंकेंना दम भरल्यानंतर सुप्रिया सुळे पुढे आल्या आहेत. सुप्रिया सुळेंनी यावरून अजितदादांना सुनावले आहे.

सुप्रिया सुळे नगरमध्ये नीलेश लंकेच्या प्रचारासाठी होत्या. जयंत पाटील यांच्याबरोबर सुप्रिया सुळेंनी नीलेश लंकेंसाठी सभा घेतल्या. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या भाषणातून भाजपवर जोरदार प्रहार केले. त्यावेळी त्यांनी अजितदादांनी लंकेंना केलेल्या दमबाजीवरून चांगले सुनावले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "नीलेश लंकेंना दमबाजी करणाऱ्यांनी घरात दमबाजी करावी. लंकेंना दमदाटी केल्यास सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील.

Ajit Pawar, Supriya Sule, Nilesh Lanke
Nagar Lok Sabha Election : सुजय विखेंना उमेदवारी मिळण्याबाबतचा 'क्राइटेरिया' थोरातांनी सांगून टाकला

हे ज्यांना घाबरतात, त्यांच्यासमोर आम्ही दिल्लीत भाषण करतो". मी सकाळी लवकर उठतो. मी खोटं बोलत नाही. दमदाटीचं राहू दे रे. कोण घाबरत नाही. आजच्या सभेत कोण तरी समोरून उठला, 'रामकृष्ण हरी वाजवा तुतारी', असा म्हणाला. दमदाटी संस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही खपवून घेणार नाही. जे नीलेश लंकेंना दम देतय ना, त्यांना सांगायचे आहे.

दमबाजी तुम्हारे घर मैं चलाओं, बाहर मत चलाओं. कशाला घाबरता यांना. हे ज्यांना घाबरतात ना, त्यांच्यासमोर आम्ही दिल्लीत भाषण करतो, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजितदादांना सुनावले. सुप्रिया सुळेंनी यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजपच्या धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेतकरी विरोधी निर्णयांवर हल्लाबोल चढवला.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

Ajit Pawar, Supriya Sule, Nilesh Lanke
Nagar Lok Sabha 2024: अजितदादा, सुप्रियाताई, पंकजाताई, आठवलेंच्या निशाण्यावर कोण ? नगरमध्ये सभांचा धडाका

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "कांद्याची निर्यातबंदी केल्याने नगर, नाशिक, जळगावमधील शेतकऱ्यांची कोंडी केली. परंतु तेथील भाजप उमेदवारांना फिरणे मुश्किल झाले. शेतकरी कांदा फेकून मारू लागले आहेत. असे असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल आसूया दाखवली. गुजरातला कांदा निर्यातला परवानगी दिली. महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले. हे जाणिवपूर्व केले जात आहे". संसदेत भाजपच्या 303 खासदारांपैकी एकानेही कांदा विषयावर तोंड उघडले नाही. केवळ आम्ही या प्रश्नाकडे लक्ष वेधल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

Ajit Pawar, Supriya Sule, Nilesh Lanke
Supriya Sule News : 'भीती कशाचीच नाही पण...'; बारामतीबाबत सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com