Sushma Andhare : धनंजय मुंडेंच्या मदतीला ठाकरेंची वाघीण धावली; म्हणाल्या, 'संघी मानसिकतेतून...'

Sushma Andhare Opposes Criticism of Dhananjay Munde : 'करुणा की राजश्री मुंडेंच्या पहिल्या पत्नी कोण? मुंडेंचं पर्सनल लाईफ' असे थंबनेल असलेल्या फोटो टाकत सुषमा अंधारेंनी धनंजय मुंडेंवर वैयक्तिक टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.
Sushma Andhare Dhananjay Munde
Sushma Andhare Dhananjay Munde sarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधी पक्षांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून देखील त्यांच्यावर यूट्यूबवर काही व्हिडिओमधून चिखलफेक करण्यात येत आहे. त्यावरूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर पोस्ट करत मुंडेंची पाठराखण केली आहे.

'करुणा की राजश्री मुंडेंच्या पहिल्या पत्नी कोण? मुंडेंचं पर्सनल लाईफ' असे थंबनेल असलेल्या फोटो टाकत आपल्या पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की, काही निवडक सन्माननीय अपवाद वगळता सध्या युट्यूबवर फक्त दर्शक संख्या वाढवण्यासाठी वाटेल ते थंबनेल चिकटवणे आणि दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घुसण्याचा जणू आपल्याला शासनमान्य परवानाच आहे, या थाटात वाटेल त्या पद्धतीने मांडणे सुरू आहे. अॅनेलिसीसच्या नावाखाली केलेला निव्वळ सवंगपणा आणि संघी मानसिकतेतून केलेली मांडणी, विषारी पेरणी ही घातक आहे.

'संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. हा कट ज्याने कोणी रचला त्या मास्टर माईंडला सुद्धा फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. मात्र ही अपेक्षा असतानाच आपण एखाद्याचं कुटुंब त्यांच्या मुलांचं आयुष्य उध्वस्त करतोय का? याचा सुद्धा विचार करायला हवा.', असे आपल्या पोस्टमध्ये म्हणत अंधारे यांनी धनंजय मुंडे यांच्या खासगी आयुष्याबाबत केलेल्या जाणाऱ्या टीका टीपण्णीला विरोध दर्शवला आहे.

...तर धनंजय मुंडेंना शिक्षा व्हावी

सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की,'संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे दोषी असतील तर धनंजय मुंडे यांना सुद्धा शिक्षा व्हायला हवी. पण अशा पद्धतीने त्यांच्या खासगी आयुष्यातील त्यांच्या मुलांची माहिती सार्वजनिक करणे हा गुन्हा आहे. नैतिकदृष्ट्या सुद्धा हे योग्य नाही. त्या मुलांच्या मानसिकतेवर याचा काय परिणाम होत असेल. ते ज्या कॉलेजेस मध्ये शिकतात तिथला त्यांचा भवताल, त्यांचे मित्र-मैत्रिणी यांच्यावर काय परिणाम होत असेल याचा कृपया विचार करा. भानावर या. टीआरपी च्या नावाखाली असले सवंग प्रकार थांबवा...',

Sushma Andhare Dhananjay Munde
Balasaheb Thorat : शिंदे नाराज झाले की, शेतावर जातात, सरकार कसं चालणार? काँग्रेस नेत्याचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com