Balasaheb Thorat : शिंदे नाराज झाले की, शेतावर जातात, सरकार कसं चालणार? काँग्रेस नेत्याचा टोला

Congress Balasaheb Thorat ShivSena DCM Eknath Shinde guardian minister Mahayuti government : महायुती सरकारच्या गोंधळावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसल्यापासून संगमनेर मतदारसंघात चांगलेच अॅक्टिव्ह झालेत. संगमनेर मतदारसंघात गावभेटींचा धडाका त्यांनी लावला आहे. गावभेटी दौऱ्यादरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारच्या गोंधळावर निशाणा साधला.

छोट्या-छोट्या मुद्यांवरून महायुतीत नाराज होत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 'एकनाथ शिंदे नाराज होऊन शेतावर जाऊन बसतात. सरकार कसे चालणार? हे काळजी कण्यासारखेच आहे', असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "महायुतीत (Mahayuti) छोट्या-छोट्या मुद्यांवर रूसवा-फुगवी सुरू आहे, त्यामुळे महायुतीचे भविष्य कठीण दिसते. एक उपमुख्यमंत्री होऊन पुन्हा मुख्यमंत्री. एकाची कायमच मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. सत्तेसाठी सर्वकाही हे महायुतीचे सूत्र यातून स्पष्ट होते. यामुळे महायुतीत ताणतणाव अधिकच दिसतो". पालकमंत्री पदाबाबतचा अजूनही गोंधळ सुरू आहे. एकनाथ शिंदे नाराज होऊन शेतावर जाऊन बसतात. सरकार कसे चालणार? हे काळजी कण्यासारखे आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.

Balasaheb Thorat
Ladki Bahin Yojana Maharashtra : 'या' लाडक्या बहि‍णींचा लाभ फेब्रुवारीपासून बंद होणार

काँग्रेसमध्ये (Congress) प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहत आहेत. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले काम करत आहेत. नवीन अध्यक्षपदाबाबतची चर्चा माझ्यापर्यंत नाही, असे सांगून अधिक भाष्य करण्याचे टाळले.

Balasaheb Thorat
BJP Politics : उपमुख्यमंत्र्यांना थेट स्टेजवरच 7 कोटींचा जाब विचारणाऱ्या महिला आमदार कोण? दोनदा होत्या खासदार...

उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यावर थोरात यांनी आम्ही सर्व एकत्र बसून चर्चा करू. 2019 पासून महाविकास आघाडी म्हणून आम्ही चांगले काम करत आलो आहोत. एकत्र राहण्याचे फायदे विसरता येणार नाहीत. एकमेकांना साथ देत पुढे जावे लागेल. महायुतीची कार्यपद्धती जनतेला हितकारक नाही, हे पुन्हा एकदा लक्षात आणून द्यावा लागेल, असे सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस दमदार कामगिरीच्या तयारी आहेत, हे सांगताना बाळासाहेब थोरात यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आम्ही सतर्क आहोत. गावभेटीवर जोर वाढवला आहे. संगमनेर मतदारसंघातील गावोगावी जात आहोत. आढावा घेत आहोत. विधानसभेतील पराभवाच्या कारणांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यातून पुन्हा बाहेर पडू, जनतेशी संवाद साधणे माझे काम आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com