Shivsena-Vanchit News : बसपा म्हणते, शिवसेना-वंचित म्हणजे दोन नातवंडांची युती..

Marathwada : पक्ष सांभाळता आला नाही, ज्यांच्या नेतृत्वावर असंख्य प्रश्नचिन्ह आहेत, अशा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणे कितपत योग्य आहे ?
Uddhav Thackrey & Adv. Prakash Ambedkar Alliance News
Uddhav Thackrey & Adv. Prakash Ambedkar Alliance NewsSarkarnama

BSP : राज्यातील राजकारणात नव्याने उदयाला आलेल्या शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीचा (Vanchit Bahujan Aghadi) बहुजन समाजावर कुठलाही प्रभाव पडणार नाही. महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू यांच्यात विद्यमान राजकीय स्थितीमुळे झालेली ही युती आहे. वैचारिक आंदोलनाला या युतीत कुठेही स्थान नाही, अशा शब्दात बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांनी टीका केली.

Uddhav Thackrey & Adv. Prakash Ambedkar Alliance News
Aimim : मैदानात कोणीही येवू द्या, पुन्हा मीच खासदार ; इम्तियाज यांचा दावा पटतो का ?

२०१९ पूर्वी भारिप बहुजन महासंघाचे राज्यात काय अस्तित्व होते, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अशात (Shivsena) शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकरांचा घरोबा आंबेडकरी समाजाला रुचणार नाही. आंबेडकरी विचारधारा हिंदुत्ववादी विचारधारेची कट्टर विरोधक आहे. या वैचारिक संघर्षाचा इतिहास जुना आहे. (Prakash Ambedkar) त्यामुळे या वैचारिकतेसोबत केवळ राजकीय फायद्यासाठी तडजोड करण्याच्या निर्णयाचा आंबेडकरी समाजावर प्रभाव पडणार नाही,असा दावा देखील ताजणे यांनी केला आहे.

पक्षातील बंडानंतर एकाकी पडलेले उद्धव ठाकरे आपले राजकीय अस्ति​त्व टिकवण्यासाठी भीमशक्तीचा आधारे घेत आहेत. यापूर्वी ज्यांनी बहुजनांची हेटाळणी केली, ज्यांनी महामानवाचे नाव विद्यापीठाला देण्याला विरोध करीत आमच्या घरातील पीठ काढलं, त्यांच्या सोबत प्रकाश आंबेडकरांनी जाण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. बाबासाहेबांचा वारसा चालवण्याचे काम करीत बहुजनांना शासनकर्ती जमात बनवण्याचे काम कांशीराम साहेब आणि त्यांच्यानंतर बहन मायावतीजी यांनी खऱ्या अर्थाने केले आहे.

पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजन चळवळ, आंबेडकरी समाज यापूर्वी, आज आणि भविष्यात ही बसपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, आहे आणि राहील, असा दावाही ताजने यांनी केला. ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ज्यांच्या नेतृत्वावर असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत, अशा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणे कितपत योग्य आहे? याचा देखील विचार आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी केला पाहिजे.

महाराष्ट्रात साठोत्तर काळापासून बाळासाहेब ठाकरे विरुद्ध दलित, नवबौद्ध किंवा शिवसेना विरुद्ध दलित पँथर, आंबेडकरी संघटना असा थेट राजकीय-सामाजिक संघर्ष झडत राहिला आहे. हा संघर्ष वैचारिकही आहे. आरक्षण, नामांतर, हिंदुत्व अशा प्रत्येक मुद्यावर हा संघर्ष झडत गेला, परंतु आता केवळ राजकीय फायद्यासाठी युतीचा निर्णय दुर्दैवीच आहे, असेही ताजने म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com