MLA Ratnakar Gutte : 'मी जेलमध्ये जावं अशी अनेकांची इच्छा होती...'; आमदार गुट्टेंचं खळबळजनक विधान

Marathawada Political News : 'जेलमध्ये मी योगा केला. यादरम्यान अनेकांच्या जमानतीही केल्या...'
Ratnakar gutte
Ratnakar guttesarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी माझ्याकडे भरपूर निधी आहे. राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे, माझेही तिघांवर प्रेम आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांनाही असं वाटत की मी त्यांच्याकडे यावे, पण मी कोणाकडेच जात नाही. मी मतदारसंघातील कामे करून घेतो, असा दावा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला.

गंगाखेड येथील प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी मी जेलमध्ये जावे, असे अनेकांची इच्छा होती, मी तीही पूर्ण केली, असे म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे हेच असतील, असे त्यांच्या मागच्या दौऱ्यात जाहीर केले होते. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनीही गंगाखेड मतदारसंघाचा दौरा करत रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला होता.

Ratnakar gutte
Pune Mahayuti Melava : मनोमिलन तर दूरच, पण रुसवे-फुगवे वाढले; महायुतीत बॅनरवरून वाद

या पार्श्वभूमीवर रत्नाकर गुट्टे(Ratnakar Gutte) यांचे आजचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. मी सर्वात प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यकर्ता आहे. विविध राजकीय विषयावर आम्ही चर्चा करत असू. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मला खूप सहकार्य केले. माझ्या साखर कारखान्याची चौकशी करण्याची मागणी होत असताना माझ्या कारखान्यासह सर्वच कारखान्याची चौकशी करू, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले होते. तेव्हापासून माझ्याविरोधातील आवाज बंद झाला, असेही गुट्टे म्हणाले.

मी जेलमध्ये गेलो, कारण कोणाच्या तरी इच्छा पूर्ण करायच्या होत्या. त्यांच्या खूप इच्छा होत्या की, मी जेलमध्ये जावे. मी जेलमध्ये नसतो गेलो तर ते थांबतच नव्हते. मला जामीन मिळाली असता मात्र, तरीही मी जाणूनबुजून जेलमध्ये गेलो. कारण मलाही जेल बघायची होती. जेलमध्ये गेल्यावर माणूस मोठा होतो, त्यामुळे जेल भोगलेच पाहिजे. जेलमध्ये मी योगा केला. यादरम्यान अनेकांच्या जमानतीही केल्या, असे सांगत गुट्टे यांनी विरोधकांना डिवचले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदारसंघातील अनेकजण सांगतात, अधिकारी कामे करत नाहीत पैसे मागतात. अधिकाऱ्यांनी नियमित कामे करण्यासाठी नकार दिला, पैसे मागितले तर त्याला तिथेच हाणा. परंतु त्यासाठी सोबत एक मागासवर्गीयही असावा, असा सल्लाही गुट्टे यांनी यावेळी दिला. अधिकाऱ्यांनी 353 ची तक्रार केली तर आपण अॅट्रोसिटी करायची. पैसे खाणाऱ्याला मी सोडणार नाही, अधिकाऱ्यात भीती निर्माण झाली पाहीजे. आणि भीत नसतील तर त्यांना मी सांगितल्याप्रमाणे हाणा, असे जाहीर आवाहन गुट्टे यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली.

(Edited By Deepak Kulkarni)

Ratnakar gutte
Pune Mahayuti Melava : मनोमिलन तर दूरच, पण रुसवे-फुगवे वाढले; महायुतीत बॅनरवरून वाद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com