Antarwali Sarati Sabha : फडणवीस झाले अलर्ट; थेट ‘स्पेशल आयजीं’नाच धाडले अंतरवाली सराटीत...

Jalna News : विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांनी अंतरवाली सराटीतील सभेच्या तयारीची पाहणी केली
Antarwali Sarati Sabha
Antarwali Sarati Sabha Sarkarnama
Published on
Updated on

Jalna News : अंतरवाली सराटीत (जि. जालना) येत्या १४ तारखेला मराठा आरक्षणासंदर्भात भव्य सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील अनुभव लक्षात घेऊन पोलिस प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. मागील चुकांमुळे सरकारला विशेषतः उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. पण, आज खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षकच अंतरवाली सराटीत उतरले आहेत. (SIG of Police& SP inspects preparations for the meeting in Antarwali Sarati)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सलग १७ दिवस उपोषण केले होते. त्या उपोषणावेळी लाठीहल्ल्याची घटना घडली होती. त्या घटनेत स्थानिक नागरिक जखमी झाले होते. त्या लाठीहल्ल्यावरून सरकारवर मोठी नामुष्की ओढवली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता. खुद्द जरांगे पाटील यांनीही कडवट शब्दांत ताशेरे ओढले होते.

Antarwali Sarati Sabha
Dasara Melava 2023 : ‘दसरा मेळावा शिवतीर्थवरच...वाजत-गाजत गुलाल उधळत जायचंय’; शिवसेनेची प्रतिक्रिया

जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासंदर्भात सध्या जागृती करण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. अंतरवाली सराटीत येत्या १४ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या सभेचे निमंत्रण देत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन व्यासपीठ आणि मंडपाच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्या सर्व कामांवर पोलिसांची बारीक नजर आहे.

उपोषणावेळी झालेला लाठीहल्ला आणि त्यानंतर सरकारवर झालेली टीका या गोष्टी टाळण्यासाठी गृह विभागाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे या सभेच्या तयारीची पाहणी स्थानिक पोलिस प्रशासनासह वरिष्ठ पोलिस अधिकारीही लक्ष ठेवून आहेत.

विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णा चव्हाण, जालन्याचे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी आज (ता. १० ऑक्टोबर) अंतरवाली सराटी येथे भेट दिली. जाहीर सभेच्या तयारीची त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Antarwali Sarati Sabha
Nagar Politics : नगर नव्हे अहिल्यानगर; सुळेंचा दौरा अन् प्राजक्त तनपुरेंच्या ट्विटची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com