Shivsena (UT) Deligation Meet Municipal Administrator : नागरी समस्या सोडवा, शिवसेनेचे नव्या आयुक्तांना साकडे..

Municipal Corporation : रस्त्यावर खड्डे पडले आहेत, यामुळे छोटे-मोठे अपघात दररोज होतात, त्यामुळे ते तातडीने बुजवावेत
Shivsena (UT) Deligation Meet Municipal Administrator
Shivsena (UT) Deligation Meet Municipal Administrator Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासक पदी नुकतीच जी. श्रीकांत (Municipal Administrator ) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी कामाला सुरूवात केली असून महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आढावा घेतला. दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज नव्या प्रशासकांची भेट घेतली.

Shivsena (UT) Deligation Meet Municipal Administrator
Health Department Recruitment News : इम्तियाज यांच्या याचिकेला यश, न्यायालयाच्या आदेशाने आरोग्य विभागात मेगा भरती...

या भेटीत शहरातील खड्डे व इतर मुलभूत पायासुविधांचे प्रश्न तातडीने सोडवा, असे साकडे जी. श्रीकांत यांना घालण्यात आले. (Shivsena) गेल्या तीन वर्षांपासून शहरात प्रशासकांच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना आपल्या प्रश्नांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाच भेटावे लागते.

रस्ते, खड्डे, पाणी यासह अनेक मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या सर्व मागण्या आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला देत आहोत. (Aurangabad) आपण शहरातील मूलभूत नागरी समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी मागणी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी यावेळी केली.

जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन दिले तेव्हा जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, विधानसभा संघटक राजू वैद्य आदींची उपस्थिती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, बसवेश्वर पुतळा, महाराणा पुतळा, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, घरकुल योजना.

तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक नूतनीकरण, संत तुकाराम महाराज नाट्यगृह सुशोभिकरण, मार्केट कमिटी, व्यापारी महासंघ यांच्या समस्या, सफारी पार्क, स्मार्ट सिटी, सिमेंट रोड, नोकरभरती, महिला शौचालय, खड्डे, पाणीपुरवठा, पथदिवे आदी समस्यावर चर्चा करण्यात आली. शहरातील अनेक भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत, यामुळे छोटे-मोठे अपघात दररोज होतात, त्यामुळे ते तातडीने बुजवावेत, असेही खैरे यांनी भेटीत सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com