Saamana Editorial News : "देवेंद्र फडणवीसांवर झालेल्या अन्यायाला 'सामना'ने वाचा फोडली !"

Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : "सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे ती आग विझवावीच लागेल.."
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis :
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दैनिक 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर करण्यात आलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली होती. यावरून 'सामना' आणि ठाकरे गटाविरूद्ध भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन आंदोलन केले. 'सामना' वृत्तपत्राच्या प्रतींची होळी भाजपकडून करण्यात आली होती. (Latest Marathi News)

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर थेट, 'सामना' ज्या पद्धतीने आग ओकत आहे ती आग विझवावीच लागेल,' असा गर्भित इशाराच दिला होता. या वादावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सामनाची बाजू घेऊन, 'फडणवीस यांच्यावर भाजपमधून होत असलेल्या अन्यायाला 'सामना'ने वाचा फोडल्याचे म्हंटले आहे. (Saamana Editorial News)

Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis :
Vijay Wadettiwar Opposition Leader : विजय वडेट्टीवार अखेर विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीत बसले

'सामना' अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. यावरून राज्याचे राजकीय वातावरणही तापले होते. राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. सामनातून फडणवीसांवर साधण्यात आलेल्या निशाण्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी उलट 'सामना'ने फडणवीसांची बाजू मांडल्याची प्रतिक्रिया, व्यक्त केली आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

वडेट्टीवार म्हणाले, "सामना'मधील भाषा नीट जर का वाचली, त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा समर्थनच केला गेला आहे. फडणवीसांवर भाजपमधून झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी महाराष्ट्राचं सलग पाच वर्षे नेतृत्त्व केलं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे मोठ्या प्रमाणावर खासदार आणि आमदार निवडून आलेत. असं असताना त्यांना उपमुख्यमंत्रीपदी का बसवलं? चाळीस आमदारांच्या गटाला मुख्यमंत्रीपद का दिलं? यानंतर अजून एक (अजित पवार) उपमुख्यमंत्री का आणले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis :
Congress News : 'विरोधी पक्षनेतेपद कसे आणले ?' तुमचे समर्थक हे माझेच आमदार; वडेट्टीवारांच्या खुलाश्याने सगळेच अवाक..

वडेट्टीवार पुढे म्हणाले, "फडणवीसांची प्रतिभा, त्यांच्या अभ्यास पाहिल्यावर त्यांची भाजपमध्ये कुचंबना होत आहे, असं मला वाटतं. त्यांचा सन्मान कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वाभिमानाने, ताठ मानेने उभे राहिलेल्या फडणवीसांना अर्ध्यावर आणून ठेवलं आहे, त्यामुळे फडणवीसांची खदखद 'सामना'ने मांडली, असं मला वाटतं," अशा शब्दात वडेट्टीवारांनी 'सामना'ची बाजू घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com