Marathwada Cabinet Meeting : पन्नास मिनिटांच्या बैठकीसाठी कोट्यवधींचा खर्च; तरीही जुन्याच घोषणा...

Ambadas Danve News : २०१६-२०२३ सालच्या घोषणा काढून पाहिल्या तर या दोन्हीत किंचितही फरक नाही.
Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News
Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad Political News : सात वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणा आणि आज २०२३ मध्ये केलेल्या घोषणा यात किंचितही फरक नाही. मग ५० मिनिटांच्या बैठकीवर कोट्यवधींचा खर्च कशासाठी? असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांवर टीका केली.

Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News
Marathwada Cabinet Meeting : हे तर असं झालं, `गणपती आले आणि नाचून गेले`, राऊतांकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली...

मराठवाड्यातील जनतेच्या आशा-आकांक्षा धुळीस मिळवण्याचे काम मंत्रिमंडळ बैठकीतून झाले असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. (Shivsena) ५० मिनिटांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मराठवाडा अशा परिस्थितीत असताना महागडे सूट बुक करण्यावर आम्ही बोट ठेवले. (Eknath Shinde) म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांना शासकीय विश्रामगृहात राहायला जावे लागत आहे. मराठवाड्याचा अपेक्षाभंग आज मिंधे सरकारने केला आहे.

जनता सर्व पाहते, एवढं लक्षात ठेवा. सरकारने सिंचनाच्या दृष्टीने ज्या घोषणा आज केल्या त्यामधील 'पार-गोदावरी' सिंचन योजना मुख्यमंत्र्यांनी सांगून दाखवावी. (Marathwada) ज्या घोषणा आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर झाल्या त्या म्हणजे 'जुनी दारू आणि नवीन बाटली' अशाच आहेत. ज्या 'हायब्रीड अॅन्युटी' योजनेचा आज उल्लेख झाला, ही योजना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पोसण्यासाठी वापरली जात आहे.

पैसे दिले गेले, पण या योजनेतील प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. ज्या गोष्टींसाठी अगोदरच अर्थसंकल्पीय तरतूद केली गेली, त्याच घोषणा यंदा केल्या आहेत. २०१६-२०२३ सालच्या घोषणा काढून पाहिल्या तर या दोन्हीत किंचितही फरक नाही. ज्या जालना सीडपार्कचा विषय आज केला गेला त्या सीडपार्कसाठी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. त्यापुढे हे काम तसूभरही पुढे सरकले नाही.

१४ हजार कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन सिंचनाच्या कामाला चालना देण्याचा देखावा करण्यात आला. याच कामांच्या सर्वेक्षणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली. अजून सर्वेक्षणच झालेले नाही तर मग १४ हजार कोटींची मान्यता कशी देता येऊ शकते? असा सवालही दानवे यांनी केला. उद्धव ठाकरे सरकारने वैतरणा-मुकणे सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली आहे. माझे आव्हान आहे या सरकारला की, त्यांनी हे काम पूर्ण करून दाखवावे. ज्या मराठवाड्याच्या प्रकल्पांची जंत्री आज वाचली गेली, त्यातील रक्कम ही मराठवाड्यात नगण्य प्रमाणात खर्च झाली आहे, असा आरोपही दानवे यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com