Marathwada Cabinet Meeting : हे तर असं झालं, `गणपती आले आणि नाचून गेले`, राऊतांकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली...

Aurangabad News : मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत; पण मंत्री फक्त ताफे घेऊन फिरत आहेत.
Sanjay Raut On Eknath Shinde
Sanjay Raut On Eknath Shinde Sarkarnama

Shivsena UBT News : मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत मी येणार म्हणून ते अस्वस्थ होते. पण मी गेलो नाही, त्यामुळे त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला असेल. (Cabinet News) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या, त्यातून नेमकं मराठवाड्याला काय मिळालं? सामान्य माणूस, शेतकऱ्यांना या घोषणांमधून काय मिळाले? हे तर असं झालं `गणपती आले आणि नाचून गले`, असा टोला शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

Sanjay Raut On Eknath Shinde
Marathwada Cabinet Meeting : मराठवाड्यासाठी घोषणांचा पाऊस; पण विकासाचा अनुशेष भरून निघणार का ?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर केले. यावर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला मी हजर राहणार असे सांगितले आणि ते अस्वस्थ झाले. (Sanjay Raut) पण मी जाणे टाळले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. माझ्यावर लक्ष ठेवायला खास पोलिस ठेवले होते.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून मराठवाड्याच्या जनतेला काय मिळाले? हा खरा प्रश्न आहे. २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ५० हजार कोटींची घोषणा केली होती. (Shivsena) आता ४६ हजार कोटींच्या योजनांची घोषणा केली आहे. फक्त घोषणा करण्यासाठीच एवढा पैसा खर्च केला का? किती पैसे खर्च केले, याचा हिशेब द्या.

मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पण मंत्री फक्त ताफे घेऊन फिरत आहेत. रस्ते बंद केले जात आहेत, यांना आता लोकांची भीती वाटायला लागली आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. संभाजीनगर, धाराशिव केल्याचे श्रेय हे सरकार घेत आहे, पण संभाजीनगर हे महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनीच केले. त्यामुळे याचे खरे श्रेय ठाकरेंचे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com