Srijaya Chavan News : '...तर भोकरमधून विधानसभा निवडणूक लढवणार'; श्रीजया चव्हाण यांचं सूचक विधान!

Ashok Chavan News : भाजपत जाण्याचा निर्णय अशोक चव्हाणांनी कुटुंबाशी चर्चेनंतरच घेतला!
Srijaya Chavan
Srijaya ChavanSarkarnama
Published on
Updated on

Bhokar Assembly Constituency News : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अजूनही सुरूच आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपण भाजपमध्ये जाणार नाही, केवळ दिशाभूल करण्यासाठी विरोधकांकडून अशा अफवा पसरवल्या जातात, असा दावा करणारे अशोक चव्हाण अखेर भाजपवासी झालेच.

तर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांशी चर्चा करूनच घेतला, असा खुलासा त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांनी केला आहे, तर अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांनी भोकरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशाबद्दल पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने जाहीरपणे भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना अमिता चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय हा संपूर्ण कुटुंबाचा निर्णय असल्याचे सांगितले. तसेच 'हिंदू संस्कृतीनुसार आपण पतीसोबत आहोत. भाजप प्रवेशाबाबत आमच्या कुटुंबात चर्चा झाली होती. कोणताही निर्णय घेताना आमच्या कुटुंबात चर्चा होते. त्यानंतर योग्य तो निर्णय ते घेतात,' असंही अमिता चव्हाण यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Srijaya Chavan
MP Imtiaz Jaleel : वेळ तुम्ही सांगा, तारीख तुमच्या सोयीची, जागा तुमच्या आवडीची... एकदा होऊन जाऊ दे!

अशोक चव्हाण भाजपकडून(BJP) राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्यानंतर त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून चव्हाण कुटुंबातील कोणी असेल की मग इतर कोणी? यावरही अमिता चव्हाण यांनी भाष्य केले. 'लोकांची मते जाणून घेऊ, श्रीजया भोकरमधून लढण्यास इच्छुक असतील तरी जनतेचे मत काय आहे? हे जाणून घेतल्यावरच योग्य निर्णय घेतला जाईल. आम्ही लोकांवर उमेदवार लादणार नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले. श्रीजया चव्हाण या गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.

'भोकरच्या लोकांची आणि साहेबांची(अशोक चव्हाण) ईच्छा असेल तर निवडणूक लढवीन.', अशा एका वाक्यात श्रीजया चव्हाण यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली. भोकर‌ विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून गेल्या अनेक निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारस आहेत. त्यामूळे भोकर विधानसभेतून त्याच भाजपच्या उमेदवार राहणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Srijaya Chavan
Nanded Politics : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे 'एमआयएम'च्या पतंगाला नांदेडमध्ये हवा ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com