Shiv Sena News : खासदार शिंदेंची अजित पवार गटावर कुरघोडी? 'या' नेत्याला बळ

Saeed Khan : सईद खान यांना पद देऊन ठाकरे गटालाही आव्हान
 Saeed Khan, shrikant shinde
Saeed Khan, shrikant shinde
Published on
Updated on

Parbhani news :  `खान हवा की बाण` या मुद्द्यावर निवडणूक प्रचार होत असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचा बाण उचलणाऱ्या सईद खान यांचा शिंदे गटाला मजबूत आधार मिळाला आहे. शिवसेनेने सईद खान यांना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष करून राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली. सईद खान यांनीही संधीचे सोने करत परभणी, मुंबई व पाथरी येथे पक्षाचे मेळावे आयोजित करत शक्तीप्रदर्शन केले. पाथरी येथील कार्यक्रमास उपस्थित राहून खासदार श्रीकांत शिंदे यांनी सईद खान यांचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीबाबत योग्य तो संदेश दिला. पाथरीमधील वर्चस्वाच्या लढाईत सईद खान यांना श्रीकांत शिंदेकडून बळ दिले जात आहे.

 Saeed Khan, shrikant shinde
Rajasthan CM Oath : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीत चर्चा कट्टर विरोधकांची; गेहलोत अन् शेखावत व्यासपीठावर एकत्र

सईद खान यांचे वाढते वर्चस्व अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. मागील 25 वर्षांपासून पाथरी शहरात दुर्राणी यांच्याकडे एकहाती सत्ता राहिलेली आहे. तसेच तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ही दुर्राणी हेच होते. मात्र, सईद खान यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश करताच तालुक्यातील सरपंच व कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश घडवून आणत आहेत. दुर्राणी यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे खंदे समर्थक असलेल्या नेत्यांनी सईद खान यांच्याशी घरोबा केला आहे. अखेर राजकीय अपरिहार्यतेतून दुर्राणी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

 Saeed Khan, shrikant shinde
Nagar News: राधाकृष्ण विखे पाटलांना ठाकरे गट दुग्धभिषेक घालणार! काय आहे कारण..

शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी मतदारसंघातील पक्षाचे खासदार, आमदार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला विस्तार करण्यास वाव मिळाला नाही. परभणी मतदारसंघात शिंदे गटात प्रवेश केलेले माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माणिकराव आंबेगावकर यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षातून झाला आहे.

पाथरी विधानसभा मतदारसंघात काय होणार ?

शिवसेना-भाजप युतीत पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मिरा रेंगे यांनी विजय मिळवला होता. 2014 मध्ये अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी रेंगे यांना पराभूत करून विजय प्राप्त केला. विजयी झालेल्या मोहन फड यांनी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आणि 2014 मध्ये भाजपची अधिकृत उमेदवारी मिळवली. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मोहन फड हेच असतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने भाजपसोबत, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपात तिन्ही पक्षाकडून पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी आग्रह केला जाऊ शकतो. भाजपकडून माजी आमदार मोहन फड, राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) आमदार दुर्राणी तर शिवसेना (शिंदे) गटाकडून सईद खान हे प्रबळ दावेदार असू शकतात.

(Edited by Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com