

MLA Santosh Banga : हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात कामगार विभागामार्फत बांधकामांवरील कामगारांना मोफत मध्यान भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, याच मध्यान भोजन योजनेतील धक्कादायक गोष्टींचा आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भांडाफोड केला आहे. बांगर यांनी याचा जाब विचारताना थेट व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली.
हिंगोली शहराजवळील एमआयडीसी परिसरात जिल्ह्यातील कामगारांसाठी एकत्रितपणे अन्न शिजवले जाते आणि इथनच हे अन्न कामगारांना दुपारच्या वेळी वितरीत केले जाते. मात्र, कामगार विभागाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या मध्यांन भोजनात गरिबांना नित्कृष्ट दर्जाचे जेवण मिळते अशी तक्रार आमदार बांगर यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर आमदार बांगर यांनी प्रत्यक्ष हे जेवण तयार करण्यात येणाऱ्या लिंबाळा एमआयडीसी परिसरातील ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या.
या ठिकाणी शिजवण्यात येणारे अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जेवण बनवण्यासाठी वापरण्यात येणारा भाजीपाला, डाळी, कडधान्यांना अक्षरश: बुरशी लागली होती. याचा जाब त्यांनी संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करुन विचारला. सगळ्यांकडून उडवा उडीचे उत्तर मिळाल्याने आमदार संतोष बांगर चांगलेच संतापले. त्यानंतर त्यांनी थेट या ठिकाणी असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकाला जाब विचारत त्यांच्या कानशिलातच लगावली.
गोरगरिबांच्या जीवाशी का खेळता, असा संतप्त सवालही त्यांनी या व्यवस्थापकाला केला. तसेच, आमदार बांगर यांनी पाहणी केलेल्या ठिकाणी बुरशीजन्य डाळी, शिळे अन्नपदार्थ बनवण्याच्या ठिकाणी अस्वच्छता होती. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.