औरंगाबाद : औरंगाबाद शहरात खाम नदी पात्रात तुम्ही गेलात तर सर्वपक्षीय नेत्यांच्या नावाने तुम्हाला वास्तू दिसतील. हे नेते हयात असताना त्यांची नावे देण्याची कामगिरी पालिका आयुक्त आणि प्रशासक आस्तिककुमार पांडे (IAS astikumar Pandey) यांनी केली आहे.
पांडे या ठिकाणास नावे देतांना राजकीय नेत्यापुढे इतके झुकले की, त्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. त्यांनी शहतरातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना खूश करत नवख्या राजकीय नेत्यांचेही नावे या ठिकाणांना देऊन टाकले.
शहरात मंत्री आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) हस्ते या कामाचे उद्घाट्न करण्यात आले. तेथील विविध ठिकाणांना चंद्रकांत योग केंद्र, आदित्य सरोवर, अंबादास फुलपाखरू गार्डन, इम्तियाज सूर्यकुंड, भागवत तलाव अशी नेत्यांच्या नावावरून नावे देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास सर्वच पक्षांना पांडे यांनी गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, आदित्य ठाकरे, खासदार इम्तिआज जलील, आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आद्याक्षरांचा वापर करून सर्वपक्षीय समतोल साधला आहे. उद्यानाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाने सतीश नाना-नानी पार्क आहे. आमदार अतुल सावेंच्या नावाने अतुल बाल उद्यान तयार केले आहे. ओपन जिम आमदार प्रदीप जैस्वालांच्या नावावर आहे. व्हॉलीबॉल मैदानाला आमदार संजय शिरसाटांचे नाव आहे. पथदिव्यांचे डॉ. रफिक झाकरिया खाम नदी प्रकाशयोजना असे नामकरण केले आहे.
औरंगाबाद आणि नामकरण वाद काही नवीन नाही. मात्र, नुकतेच शहरातील स्थळांच्या नामांतरावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बऱ्याचदा राजकीय मंडळी आपापल्या नेत्यांच्या नावांसाठी आग्रही असतात. आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या हस्ते उदघाटन व्हावे, यासाठी प्रयत्न करत असताता. पण हयात नेत्यांचे नाव प्रकल्पाला देण्यासाठी कुणी राजकीय कार्यकर्ता अट्टहास करत नाही. अधिकारी तर अशा नामकरणाच्या बाबतीत अलिप्त राहून आपली निष्ठा उघड करत नाहीत. औरंगाबाद महापालिका बरखास्त असल्याने प्रशासक म्हणून आय़ुक्त पांडे यांच्याकडे सूत्रे आहेत. त्यांनीच हा निर्णय घेतला.
औरंगाबाद पालिकेचे आयुक्त पांडे हे राजकीय नेत्यांपुढे इतके झुकले की, त्यांनी सार्वजनिक स्थळांना कुणाचे नाव द्यावे याचे भान राहिले नाही. यामुळे त्यांच्या या निर्णयावर सामान्य नागरिक सुद्धा आश्चर्य व्यक्त करत आहेत.
याबाबत नेटकऱ्यांनी पांडे यांना सवाल विचारले आहेत. ``औरंगाबाद शहारातील अनेकांनी स्वातंत्र्य चळवळ, सयुक्त महाराष्ट्र लढ्यात व शहाराच्या विकासात योगदान दिेले आहे. त्यामध्ये अनंतराव भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, डॉ.लक्ष्मण देशपांडे, नानासाहेब भोगले, बशर नवाज, अशोक परांजपे, प्र. ई. सोनकांबळे, सुधीरदादा जोशी, भाऊसाहेब मोरे यांची नावे घेतली जातात. मात्र, यांची नावे टाळून राजकीय मंडळीचे नावे व त्यातही काही नवख्या नेत्यांची नावे दिल्याने शहरवासी कमालीचे नाराज झाले आहेत. ही नावे दिल्यावर या लोकप्रतिनिधींनी स्वत:हून हे नको म्हणून सांगायला हवे होते,`` असे मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मात्र, ते शहाणपण हल्ली मोचक्याच राजकीय नेत्यांकडे उरले आहे. मात्र, एका आयएएस अधिकाऱ्याने राजकीय मंडळीपुढे इतके झुकत असा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून टीका केली जात आहे. या नामकरणावरून भाजपच्या शहाराध्यक्षांनी विरोध दर्शवला असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.