Latur : `त्या` हेलिकाॅप्टर दुर्घटनेची पुनरावृत्ती नको, म्हणून प्रशासन घेतयं विशेष काळजी..

Nilanga :पूर्वीच्या अपघाताचे ठिकाण वगळून गावाबाहेर हेलिपॅड तयार करण्यात आले
Dcm Devenda Fadanvis News, Latur
Dcm Devenda Fadanvis News, LaturSarkarnama
Published on
Updated on

Marathwdada : माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गुरूवारी (ता. नऊ) निलंगा येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहेत. या निमित्ताने सहा वर्षापूर्वी झालेल्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेच्या कटू आठवणी समोर येत आहेत. एका कार्यक्रमातून परततांना फडणवीसांचे हेलीकाॅप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. सुदैवाने यातून ते सुखरुप बचावले होते.

Dcm Devenda Fadanvis News, Latur
Shivajirao Patil Nilangekar News: साडे दहा फूट उंच, एक टन वजनाच्या डाॅ.निलंगेकरांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण..

त्यानंतर अनेकदा विमानामध्ये तांत्रिक बिघाडामुळे त्यांना आपल्या दौऱ्यातत बदल करावे लागले याची देखील अनेक उदाहरणे आहेत. फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उद्याच्या निलंगा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासन विशेष काळजी घेत आहे. (Latur) सहावर्षापुर्वी ज्या ठिकाणी फडणवीसांच्या हेलीकाॅप्टरला अपघात झाला होता ते ठिकाण वगळून आता नणंद ता. निलंगा येथील माळरानावर फडणवीसांचे हेलीकाॅप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.

पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी कार्यक्रम व हेलिपॅडची पाहणी करत संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. २५ मे २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निलंगा येथील दौरा आटोपून मुंबईला हेलिकॉप्टरने परतत असतांना ते दुर्घटनाग्रस्त झाले होते. हेलिकॉप्टर टेकअप घेतल्यानंतर काही उंचीवरून ते खाली कोसळण्याच्या स्थितीत होते. परंतु पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकाॅप्टर सुरक्षितपणे उतरवले आणि फडणवीस बचावले होते.

आता पुन्हा फडणवीस निलंगा दौऱ्यावर येत असतांना त्यांचे हेलिकाॅप्टर सुरक्षित ठिकाणी कुठल्याही अडथळ्याशिवाय उतरवता यावे, यासाठी नव्या ठिकाणी हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण यासह अनेक नेते निलंग्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट विमानाने लातूर येथे येणार असल्याचे सांगितले जाते. तरी ऐनवेळी गैरसोय नको म्हणून हेलीपॅड देखील तयार करण्यात आले आहे. पूर्वीच्या अपघाताचे ठिकाण वगळून गावाबाहेर हेलिपॅड तयार करण्यात आले असून हेलिपॅड ठिकाणचे अंतर, जागा योग्य आहे का ? परिससर मोकळा आहे का? याची काळजी प्रशासकीय स्तरावर घेतली जात आहे.

Dcm Devenda Fadanvis News, Latur
MNS : ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत..; ठाकरेंचं सासर अन् आजोळ मनसेच्या रडारवर

हेलिपॅड परवानगी देताना निष्काळजीपणा किंवा कुठलीही चूक होणार नाहीत याबाबतची काळजी घेतली जात आहे. २५ मे २०१८ रोजी लातूरातून एक कार्यक्रम आटोपून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलीकाॅप्टरने मुंबईकडे निघाले होते. त्यांच्यासोबत सहाजण होते, निलंगा तालुक्यातील शिवाजी मैदानाजवळ त्यांच्या हेलीकाॅप्टरला अपघात झाला होता.

मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी गर्दी जमलेली असतांना हेलीकाॅप्टर धूळ उडवत उडाले, नंतर अचानक ते जवळच्या झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले होते. यात काही नागरिक देखील जखमी झाले होते. पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com