Maratha Reservation Protest : हुतात्मा काकासाहेब शिंदेंना अभिवादन करत संभाजीनगर-नगर महामार्ग रोखला..

Marathwada Political News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे व जनजागृती व्हावी यासाठी गावागावात मराठा आरक्षण संवाद मोर्चे काढणार.
Maratha Reservation Protest News
Maratha Reservation Protest NewsSarkarnama

Aurangabad Political News : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज, गोळीबार आणि अमानुष मारहाण करत ते चिरडले. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात तिसऱ्या दिवशीही उमटत आहेत. (Maratha Reservation News) मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील गोदवरी पात्रात उडी घेत काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिले होते. त्याच कायगाव टोका येथे आज हुतात्मा काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करत छत्रपती संभाजीनगर-नगर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

Maratha Reservation Protest News
Maratha Reservation Protest : दानवेंच्या भोकरदनमध्ये बंद दरम्यान तरुणाने स्वत:ची दुचाकी जाळली..

(Aurangabad) अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात शुक्रवारी पोलिसांकडून लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर राष्ट्रीय मगामार्गावर जुने कायगाव येथे रास्तारोको करण्यात आला.

याच कायगांवच्या गोदावरी नदीत जलसमाधी घेऊन हुतात्मा झालेल्या स्व. काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करून हे आंदोलन सुरू करण्यात आले. (Marathwada) मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ' रस्त्याच्या दुभाजकावर बसून ठिय्याही दिला. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे जुलै २०१८ मध्ये ठोक मोर्चाला सुरुवात होऊन त्याचे लोण हळूहळू राज्यभर पसरले होते.

हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी २३ जुलै २०१८ रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जुने कायगाव येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतली होती. शांततेत चालणारे आंदोलन येथून चिघळले होते. या घटनेला ५ वर्षे पूर्ण होऊनही मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालेले नाही. समाजाकडून आरक्षणासाठी सुमारे ५८ वर मोर्चे काढण्यात आले. ५० समाजबांधवांनी बलिदान दिले. मात्र, अजूनही आरक्षण आणि अन्य मागण्या प्रलंबित असल्याने समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे.

त्यातच अंतरवाली सराटी येथील आंदोलन शुक्रवारी चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. या घटनेचा आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी कायगाव व पंचक्रोशीतील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी साडेअकरा वाजता काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले.

Maratha Reservation Protest News
Marathas boycott Upcoming Election : बदलापूरमध्ये मराठा समाजाचा मोठा निर्णय; लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बहिष्काराचा निर्धार

दरम्यान, गावपातळीवर संवाद मोर्चाचे आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजात जनजागृती व्हावी यासाठी गावागावात मराठा आरक्षण संवाद मोर्चे काढणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले. समन्वयक बोलत आहे.

आंदोलनात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com