Thane News : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे लोण सर्व महाराष्ट्रात पसरले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ठाण्यातही मराठा समाजाच्या वतीने सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनादरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शपथ बदलापूरमध्ये मराठा समाजाने घेतली आहे. (Maratha community's decision to boycott Lok Sabha, Assembly elections in Badlapur)
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर आणि कार्यकर्त्यांवर जालन्यात पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. आंदोलकांची ज्येष्ठ शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जालन्यात जाऊन भेट घेतली. शांततेत आंदोलन चालू ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.
जालन्यातील लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. जालना जिल्ह्यातील सर्व एसटी बस बंद आहेत. तसेच, सोलापूरहून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसही सध्या बंद आहेत. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तसेच, आंदोलन ठाणे जिल्ह्यातही आज करण्यात आले.
जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. बदलापूरमध्येही त्याचा निषेध झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाचे असतानाही समाजाला आरक्षण का नाही, असा सवाल आंदोलकांनी केला आहे.
बदलापूरमध्ये सरकारचा निषेध करताना मराठा समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर सकल मराठा समाज बहिष्कार टाकणार आहे. त्याची सुरुवात बदलापूर येथून झाली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत बदलापूरमधील प्रत्येक मराठा समाज लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही. हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे, असेही आंदोलकांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.