Jalna Political News : अंतरवाली सराटी येथील घटनेविरोधातील पडसाद आज तिसऱ्या दिवशीही उमटत आहे. पोलिसांकडून झालेला लाठीहल्ला, गोळीबार आणि अमानुष मारहाणीमुळे मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. (Maratha Reservation) काल जालना जिल्ह्यातील शकडो आंदोलकांवर जाळपोळ व दगडफेक केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यानंतरही ठिकठिकाणी आंदोलन सुरूच आहेत.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. अंतरवाली सराटी येथील घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले. (Jalna) फुलंब्री येथे काल गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी आपली नवी कोरी कार जाळत अंतरवाली सराटी घटनेचा निषेध केला होता.
तर भोकरदनमध्ये एका तरूणाने स्वतःची दुचाकी जाळत आपला संताप व्यक्त केला. (Maratha Reservation) भोकरदन बंदची हाक देण्यात आली होती, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय तालुक्यातील अनेक ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. (Marathwada) या दरम्यान एका आंदोलकाने स्वतःची दुचाकी पेटवून देत निषेध व्यक्त केला. सकल मराठा समाजाच्यावतीने भोकरदन बंदची हाक देण्यात आली होती.
या बंद दरम्यान व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवत पाठिंबा दिला. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणावर सकल मराठा समाज बांधव जमा झाले होते.
यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.गणपत दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलना दरम्यान एका आंदोलनकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वतःची दुचाकी पेटवून दिली, तर काहींनी मुख्य रस्त्यावर टायरे जाळून निषेध व्यक्त केला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.