Dharashiv Flood : एक, दोन नव्हे तर तब्बल अडीच महिन्यांपासून शाळेतच गेले नाहीत विद्यार्थी; पुरामुळे नागरिकांचा संपर्कच तुटला

Dharashiv Ram River Flood : धाराशिव जिल्ह्यातील शिलवडी या गावाचा गेल्या अडीच महिन्यापासून जगाशी संपर्क तुटला आहे. या गावाजवळून वाहणाऱ्या राम नदीला पूर असल्याने एक दोन दिवस नव्हे तर तब्बल गेल्या अडीच महिन्यापासून विद्यार्थ्यांना शाळेतच जाता आले नाही.
Dharashiv flood
Dharashiv flood Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राज्यात गेल्या काही दिवसापासून पुराने थैमान घातले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्याना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे शेतातील उभ्या पिकासह शेतातली जमीन ही वाहून गेली असल्याने शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. त्यातच आता दररोज नुकसानीचा आकडा वाटत असतानाचा पुरामुळे मोठे नुकसान झाल्याचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील शिलवडी या गावाचा गेल्या अडीच महिन्यापासून जगाशी संपर्क तुटला आहे. या गावाजवळून वाहणाऱ्या राम नदीला पूर असल्याने एक दोन दिवस नव्हे तर तब्बल गेल्या अडीच महिन्यापासून विद्यार्थ्यांना शाळेतच जाता आले नाही. या सर्व प्रकाराकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे पुढे आले आहे. याठिकाणच्या नदीवर पुलच नसल्याने गैरसोय होत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील शिलवडी (Dharashiv Flood ) या गावानजीकच वाहणाऱ्या राम नदीवर पूल नाही. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून पूर आल्याने या गावाशी असलेला संपर्क तुटलेला आहे. येथील विद्यार्थ्यांना पुराच्या या पाण्यामुळे शाळेतच जाता आले नसल्याचा दावा केला आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. येथील विद्यार्थी गेल्या अडीच महिन्यांपासून विद्यार्थी शाळेत येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Dharashiv flood
BJP Politics : पडळकरांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी नगरसेवकाने चंद्रकांत पाटलांसमोरच...

या शिलवडीजवळील असलेल्या राम नदीला मे महिन्यापासून पूर आला आहे. छाती इतके पाणी या नदीतून वाहत आहे. त्यामुळे शिलवडी गावातील वस्तीवरील विद्यार्थी गावात येऊ शकत नाहीत. त्यांनी गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेचं तोंड पाहिले नसल्याचे समोर येत आहे. या नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. बालवाडी, इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंबंधी प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही असा सवाल विचारला जात आहे.

Dharashiv flood
NCP Vs BJP : भाजपने चोहोबाजूंनी कोंडी केली... अजितदादांनी शांततेत दिला धक्का; जुना बडा नेता राष्ट्रवादीत परतणार

धाराशिव जिल्ह्यातील शिलवडी या गावानजीकच वाहणाऱ्या राम नदीवर पूल नाही. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून पूर आल्याने या गावाशी असलेला संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे या कडे प्रशासनाने लक्ष देऊन राम नदीवरील पूल त्वरित बांधवा अशी मागणी जोर धरत आहे.

Dharashiv flood
Congress News : 'काँग्रेस ओबीसींचा नव्हे,तर पराभूतांचा पक्ष...'; पटोलेंच्या नेतृत्वात मोठी जबाबदारी सांभाळलेल्या नेत्यानंच डागली तोफ

शेतकऱ्याने दूधच नदीत ओतले

भूम तालुक्यातील पाठसांगवी गावाचा संपर्कही गेल्या काही दिवसापासून तुटला आहे. पाथरुड वालवड रोडवरील पुल वाहुन गेला. त्यामुळे डेअरीला दूध घालता येत नव्हते. अखेर संतप्त झालेला शेतकरी विशाल परकाळे यांनी 120 लिटर दूध दुधना नदीत ओतुन दिले. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Dharashiv flood
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'राजकारण वाटत असेल तर वाटू द्या आम्ही...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com