भाजप शहराध्यक्षाची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडून संपविले जीवन!

Beed BJP : माहिती मिळताच बीडच्या खासदार प्रितम मुंडेयांनी रूग्णालय गाठले.
Bhagirat Biyani
Bhagirat BiyaniSarkarnama

बीड : एकीकडे राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, सत्तासंघर्षाची लढाई सुरू असताना बीडशहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजपच्या शहराध्यक्षांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळच्या दरम्यान स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. या आत्महत्येमागचं कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

बीड भाजप शहरअध्यध भगीरथ बियाणी यांनी स्वतःवरच गोळी झाडून घेतली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांना रूग्णालयात नेण्यात आले होते. याची माहिती मिळताच बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी रूग्णालय गाठले. भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येमागचं कारण काय? यामागे कोणाचा दबान होता का ? यामागे राजकीय किंवा पारिवारीक कारणे आहेत का ? याचा शोध पोलिस घेत आहेत.

Bhagirat Biyani
‘गद्दारांनी चिन्ह गोठवले, खुद्दारांचे रक्त पेटले’

घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर बियाणी यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. पोस्टमार्टमनंतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील. मात्र बियाणी यांच्या आत्महत्येनंतर बीड शहरात एकच खळबळ माजली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com