‘गद्दारांनी चिन्ह गोठवले, खुद्दारांचे रक्त पेटले’

जळगाव येथे शिवसेनेचे चिन्ह गोठविल्याच्या निषेधार्थ आंदोलन करताना पक्षाचे पदाधिकारी.
Shivsena Agitation
Shivsena AgitationSarkarnama

जळगाव : निवडणूक आयोगाने (ECI) शिवसेना (Shivsena) पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह (Symbol) गोठविल्याच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलन (Agitation) करण्यात आले. निवडणूक आयोग व शासनाविरोधात (Anti Government slogans) घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांच्या `गद्दारांनी चिन्ह गोठवले, मात्र खुद्दारांचे रक्त पेटले` या घोषणांनी परिसर दणाणून सोडले. (Shivsena Uddhav Thackray group aggressivelu shout slogans in Jalgaon)

Shivsena Agitation
Uddhav Thackray: मशाली पेटवून शिवसेनेच्या नवीन निशाणीचे उत्साहात स्वागत झाले

शिवसेना महानगरतर्फे सतरा मजली प्रशासकीय इमारतीसमोर निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते. ‘सरकार हम से डरती है, निवडणूक आयोग को आगे करती है’, ‘पन्नास खोके...’, ‘निवडणूक आयोग कोणाचा, गद्दारांचा’, ‘गद्दारांनी चिन्ह गोठवले, खुद्दारांचे रक्त पेटले’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

Shivsena Agitation
Shivsena: मशाल चिन्हावर विजयी झालेले छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिले आमदार

यावेळी शिवसेना लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेतून फुटलेले आमदार व नेत्यांची संभावना गद्दार अशी केली. ते म्हणाले, शिवसेना हा मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचा श्वास आहे. गद्दार लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खोक्यांसाठी भारतीय जनता पक्षाशी संगनमत करून षडयंत्र केले. त्याचा भविष्यात त्यांना पश्चाताप होईल, मात्र जनता व मतदार त्यांची अवहेलनाच करील. शिवसेना मात्र नव्या दम्याने व ताकदीने उभी राहीली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, धरणगावचे नगराध्यक्ष नीलेश चौधरी, समन्वयक अंकुश कोळी, युवासेना जिल्हाप्रमुख पीयूष गांधी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जाकिर पठाण, मंगला बारी, मनीषा पाटील, नीता सांगोळे, गायत्री सोनवणे, नीलू इंगळे, विमल वाणी, श्रद्धा घोष, युवा सेना महानगरप्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com