Beed News: बजरंगबाप्पा -धनुभाऊ आले समोरासमोर, काय मग कसे आहात? विचारपूस करत हस्तांदोलनही केले

Dhananjay Munde And Bajrang Sonawane: बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यात शासकीय विश्रामगृहात हे दोघे समोरासमोर आले. क्षणभरासाठी वैर, राजकीय संघर्ष विसरून दोघांनी एकमेकांची काय मग कसे आहात ? अशी विचारपूस करत स्मितहास्य केले.
Dhananjay Munde Bajrang Sonawane .jpg
Dhananjay Munde Bajrang Sonawane .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : सरपंच संतोष देशमुख आणि विलास घुले यांच्या हत्या प्रकरणापासून कधीकाळी एकाच पक्षात खांद्याला खांदा लावून काम करणारे बीड जिल्ह्यातील दोन नेते सध्या एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू आणि विरोधक बनले आहेत. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यात शासकीय विश्रामगृहात हे दोघे समोरासमोर आले. क्षणभरासाठी वैर, राजकीय संघर्ष विसरून दोघांनी एकमेकांची काय मग कसे आहात ? अशी विचारपूस करत स्मितहास्य केले. हातात हात घेत खुशाली विचारत दोघेही वेगवेगळ्या मार्गाला निघून गेले. काही क्षणांच्या या भेटीने जिल्ह्यातील तापलेले वातावरण काही काळासाठी का होईना हलके झाले, याचेच दोघांच्याही समर्थकांना समाधान मिळाले.

बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गुरुवारी रात्री एक अतिशय सुखद धक्का देणारी घटना घडली. गेल्या काही महिन्यांपासून परस्परांवर जोरदार राजकीय व वैयक्तिक हल्ले चढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आमदार धनंजय मुंडे अचानक आमनेसामने आले. एवढेच नाही तर दोन्ही नेत्यांनी अत्यंत हसतमुखाने परस्परांशी हस्तांदोलन करत एकमेकांची आपुलकीने विचारपूसही केली.

​बीड जिल्ह्याच्या नवनिर्वाचित पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आणि विविध विषयांवर चर्चेसाठी बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे हे दोघेही बीडच्या शासकीय विश्रामगृहात आले होते. याच दरम्यान दोघेही एकमेकांसमोर आले.

Dhananjay Munde Bajrang Sonawane .jpg
CJP Protest: मोदी सरकारनं 'सीजेपी'च्या आंदोलनाचा घेतला मोठा धसका; संसदेवर धडकणारा आणखी एक मोर्चा थोपवण्यासाठी पळापळ

​विलास घुले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या दोन्ही प्रकरणांवरून धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात कमालीचा संघर्ष आणि टोकाची राजकीय कटुता पाहायला मिळत होती.

मात्र, गुरुवारी (ता.30) विश्रामगृहात या सर्व संघर्षाला किनार लावत दोघांनी हसत-हसत एकमेकांचा हात हातात घेतला आणि काय मग, कसे आहात? म्हणत विचारपूस केली. नेत्यांमधील हे अनपेक्षित आणि हटके हस्तांदोलन पाहून उपस्थित कार्यकर्ते व अधिकारीही चकित झाले. राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या भेटीची आणि हसऱ्या चेहऱ्याने झालेल्या हस्तांदोलनाची सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com