Shivsena News : निवडणुकीपूर्वीच संजय शिरसाट यांच्या लेकाला 'महापौरपदासाठी' शुभेच्छा : छत्रपती संभाजीनगरात इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Municipal Corporation Election 2026 : शिवसेनेते आतापर्यंत सात माजी महापौरांनी प्रवेश केला आहे. आता त्यांना प्रवेश देतांना नेमका काय शब्द दिला? हे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच ठाऊक.
Best wishes to the Guardian Minister Sanjay Shirsat's son for the future mayor's poster News
Best wishes to the Guardian Minister Sanjay Shirsat's son for the future mayor's poster NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महापालिका निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसतानाही, मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाला समर्थकांकडून “भावी महापौर” म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या.

  2. या पोस्टरबाजी आणि सोशल मीडिया मोहिमेमुळे स्थानिक राजकारणात नवा उत्साह आणि चर्चा रंगली आहे.

  3. काहींनी याला राजकीय रणनीती म्हटलं असून, तर काहीजणांनी ते फक्त समर्थकांचा उत्साह असल्याचं सांगितलं आहे.

योगेश पायघन

Municipal Corporation News : महानगर पालिकेची लगबग सुरू असली तरी अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. पाच वर्ष निवडणुका लांबल्याने इच्छूकांना आता धीर धरवेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापौरपदासह नगरसेवकांसाठीचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसताना काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी नेत्यांना खूष करण्यासाठी भावी महापौर म्हणून बॅनरबाजी सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांना भावी महापौर म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेते आतापर्यंत सात माजी महापौरांनी प्रवेश केला आहे. आता त्यांना प्रवेश देतांना नेमका काय शब्द दिला? हे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच ठाऊक. पण इकडे मात्र मंत्री पूत्र सिद्धांत शिरसाट यांना त्यांच्या समर्थकांनी भावी महापौर करून टाकले आहे.

माजी महापौर विकास जैन, नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, गजानन बारवाल, अनिता घोडेले, कला ओझा आदींसह एकूण सात माजी महापौर तसेच माजी उपमहापौर आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ असे महापालिकेच्या राजकारणातील दिग्गज एकनाथ शिंदे यांच्या समवेत शिवसेनेत दाखल झाले आहेत. तसेच पुढील काळात अनेक इच्छुकांचे इनकमिंग शिवसेनेत होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे सध्या पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हाती आहेत.

Best wishes to the Guardian Minister Sanjay Shirsat's son for the future mayor's poster News
Sanjay Shirsat : संजय शिरसाट म्हणतात, आता थांबल पाहिजे! राजकीय निवृत्ती की नवे नेतृत्व पुढे आणण्यासाठीची खेळी?

तर नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदारांसह माजी महापौरांना जबाबदाऱ्यांचे वाटप झाले आहे. दरम्यान, शिवसेनेकडून महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात स्वतः एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात दोन मेळावे घेतले. त्यात सर्वच नेत्यांनी 'ही तर कार्यकर्त्यांची निवडणूक'असल्याचा दावा केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी व्हावी यासाठी पक्षपातळीवर व्यव्हरचना सुरू आहे. त्यात पदवीधर निवडणूकीतही नोंदणीत शिवसेनेने पहिल्यांदा सक्रिय कार्यक्रम राबवण्याचे ठरवले.

Best wishes to the Guardian Minister Sanjay Shirsat's son for the future mayor's poster News
Shivsena News : 'लॅन्ड रोव्हर, डिफेंडर अलिशान गाड्यातून शिरसाट-भुमरे-गायकवाडांचा थाट! पण मालक वेगळेच

मला काय माहित?

या निवडणूकीच्या रणधूमाळीत भावी महापौर म्हणून ठळक उल्लेख करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे. होर्डींग्जवर शुभेच्छुक म्हणून पालकमंत्री संजय शिरसाट विचारमंच असा उल्लेख आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील शिवसेना पक्षातील प्रबळ दावेदार आणि इच्छुकांत अस्वस्थता पसरली आहे. यावर शहरातील पदाधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळले तर सिद्धांत शिरसाट यांनी यांनी 'मला काय माहीत'? असे म्हणत होर्डिंग बद्दल कल्पना नसल्याचे सांगत प्रतिक्रिया देणे टाळले.

नेता मोठा व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना असते. कार्यकर्ते उत्साही असतात त्यांच्या भावना ते व्यक्त करतात. म्हणजे त्यात त्या नेत्याचा तो दावा आहे असे होत नाही. कार्यकर्त्यांनी बॅनरच्या माध्यमातून इच्छा व्यक्त करणे, शुभेच्छा देणे यात गैर काही नाही. कोणतेही निर्णय शेवटी वरिष्ठ घेत असतात, असे मत माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केले. तर अजून आरक्षण काय ते माहीत नाही? निवडणुका झाल्यावर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते कोण महापौर होईल? याचा निर्णय घेतील. तो निर्णय सर्वांना मान्य असेल. कार्यकर्ते आपल्या नेत्याचे होर्डींग, बॅनर लावत असतात, असे सांगत दुसरे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी सावध भूमिका घेतली.

FAQs

1. संजय शिरसाट यांचे मुलगा कोणत्या पदासाठी चर्चेत आहे?
→ समर्थकांनी त्यांना “भावी महापौर” म्हणून शुभेच्छा दिल्याने ते महापौरपदासाठी चर्चेत आले आहेत.

2. निवडणुकीची घोषणा झाली आहे का?
→ नाही, अद्याप महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नाही.

3. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया आहेत?
→ काहींनी याला पूर्वतयारीचा भाग म्हटलं असून, काहींनी तो फक्त जनतेचा उत्साह असल्याचं सांगितलं.

4. सोशल मीडियावर काय ट्रेंड होत आहे?
→ #FutureMayor आणि #ShirsatFamilyPolitics हे हॅशटॅग स्थानिक पातळीवर ट्रेंड होत आहेत.

5. या प्रकरणाचा पक्षांवर काय परिणाम होईल?
→ या चर्चेमुळे स्थानिक भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये अंतर्गत हालचालींना गती मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com