Kalamnuri Assembly Constituency: पाडापाडीच्या यादीत नाव येताच संतोष बांगर समर्थकांचा ताफा अंतरवालीकडे निघाला

Bangar supporters appeal to Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी कळमनुरी मतदार संघाबाबत घेतलेली भूमिका मागे घ्यावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा, असे साकडे बांगर समर्थक जरांगे पाटील यांना भेटून घालणार असल्याचे बोलले जाते.
MLA Santosh Bangar
MLA Santosh BangarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यासाठी आज अंतरवाली सराटीत बोलावलेल्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत एकापाठोपाठ एक धमाके करायला सुरुवात केली आहे. कोणत्या मतदारसंघातून थेट उमेदवार देणार, कोणत्या मतदारसंघात पाडण्याची भूमिका घेणार आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार न देता पाठिंबा देणार या सगळ्याच गोष्टींचा खुलासा सकाळी सात वाजेपासून सुरू असलेल्या बैठकीनंतर जाहीर करत आहेत.

जिल्हानिहाय मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मतदार संघाची नावे घेऊन तिथे काय करायचे हे सांगत आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडण्याची भूमिका जाहीर केली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघाचा समावेश आहे. इथे शिवसेनेचे संतोष बांगर हे विद्यमान आमदार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी कळमनुरी मध्ये पाडण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर बांगर यांचे शेकडो समर्थक शंभरहून अधिक गाड्यांमध्ये अंतरवाली सराटीकडे निघाल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कळमनुरी मतदार संघाबाबत घेतलेली भूमिका मागे घ्यावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा, असे साकडे बांगर समर्थक जरांगे पाटील यांना भेटून घालणार असल्याचे बोलले जाते.

MLA Santosh Bangar
Manoj Jarange News : मनोज जरांगेंच्या हिटलिस्टवर 'ही' नेतेमंडळी; या ठिकाणी उभे करणार उमेदवार

बांगर यांच्याप्रमाणेच इतर मतदारसंघातील आमदार व इच्छुक उमेदवारांचे समर्थकही अंतरवालीत दाखल होणार असल्याची माहिती आहे. (Santosh Bangar) दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर मराठवाड्यात आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सर्व राज्यातील मतदारसंघाबाबतची भूमिका येत्या दहा तारखेपर्यंत जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

या मतदारसंघात पाडणार..

मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील भोकरदन, कळमनुरी, औसा, गंगापूर, गंगाखेड आणि जिंतूर या मतदारसंघात पाडण्याची भूमिका निभावणार असल्याचे जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com