Supriya Sule News : मुख्यमंत्र्यांनी कोणालाही क्लीन चीट देऊ नये; महाराष्ट्राच्या लेकीला न्याय द्या! सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांना आवाहन

Supriya Sule Visit Beed : सुप्रिया सुळे यांनी बीड जिल्ह्यातील मृत डाॅक्टर तरुणीला न्याय मिळावा, अशी मागणीही केली. आमची लढाई ही महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी, असल्याचे त्या म्हणाल्या.
MP Supriya Sule Visit Beed-Appeal To CM Devendra Fadnavis
MP Supriya Sule Visit Beed-Appeal To CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सुप्रिया सुळे यांनी मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या वेदना जाणून घेतल्या आणि तपासात पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली.

  2. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं की, कोणालाही क्लीन चीट देऊ नका आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करा.

  3. या प्रकरणाने राज्यात आरोग्य क्षेत्रातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.

Beed News : मुलींवर होत असलेले अत्याचार थांबले पाहिजेत. महाराष्ट्राच्या लेकीस न्याय मिळवून देणे ही सरकारची व आपली नैतिक जबाबदारी आहे. हत्या की आत्महत्या ? हे सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे. सरकारकडून येणारी असंवेदनशील आणि गलिच्छ वक्तव्यं अत्यंत दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान लेकीवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सन्मानाचे आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणालाही क्लीन चीट देऊ नये, लेकीला न्याय द्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बीडमध्ये महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेऊन तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या लढ्यात सहभागी आहोत. खंबीरपणे तुमच्यासोबत हा लढा देऊ आणि न्याय मिळवू, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी बीड जिल्ह्यातील मृत डाॅक्टर तरुणीला न्याय मिळावा, अशी मागणीही केली. आमची लढाई ही महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी, असल्याचे त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी आज कवडगाव (बु.) येथे मृत डाॅक्टरच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणालाही क्लीन चीट देऊ नये. तपास पूर्ण होण्याआधीच आरोप-प्रत्यारोप सुरू करणे अयोग्य आहे. तपासाच्या आधी कुणालाही बदनाम करू नका. चुकीची वक्तव्य करणाऱ्या सत्तेतील पदाधिकाऱ्यांना आवर घालावा. आम्ही या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. जोपर्यंत पिडित कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही.

MP Supriya Sule Visit Beed-Appeal To CM Devendra Fadnavis
Beed politics : बीडमध्ये महायुतीत भूकंप; मुंडे बहीण-भाऊ पुन्हा आमने सामने?

मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या लेकीस न्याय द्या. तपासासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटी नियुक्त करा. तपास पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष असावा. राजकीय दबाव किंवा हस्तक्षेप होऊ देऊ नका. प्रकरणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही माहिती देण्यात येणार आहे.

MP Supriya Sule Visit Beed-Appeal To CM Devendra Fadnavis
Supriya Sule: महाराष्ट्राच्या लेकीसाठी दिल्ली दरबारी न्याय मागणार; अमित शहांच्या कानावर ही गोष्ट घालणार

महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा आता केवळ राज्याचा नाही, तर राष्ट्रीय मुद्दा झाला आहे. केंद्रानेही या दिशेने गंभीर पावले उचलावीत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या प्रकरणाने महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि शासनातील भ्रष्ट प्रणालीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, आणि राजकीय नेते आता एकमुखाने या प्रकरणात निष्पक्ष तपासाची मागणी करत असल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

लढाईत शेवटपर्यंत कुटुंबासोबत

ही घटना महाराष्ट्राला हादरवणारी, अंतर्मुख करणारी आणि शासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. मृत डाॅक्टर तरुणीच्या मृत्यूचा तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. हे प्रकरण दाबू देणार नाही, आम्ही या लढाईत शेवटपर्यंत कुटुंबासोबत राहु, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी पिडित कुटुंबीयांना दिला. या प्रकरणाची संपूर्ण माहिती मी खासदार बजरंग सोनवणे यांना सोबत घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तो आता राष्ट्रीय चिंतेचा विषय बनला आहे.

केंद्राने या दिशेने ठोस आणि कठोर भूमिका घ्यावी. राज्यातील भ्रष्ट व निष्क्रिय यंत्रणेवर नियंत्रण आणावे. या घटनेने शासनव्यवस्थेतील बेफिकीरी, भ्रष्टाचार आूणि महिलांवरील अन्याय यांचा पर्दाफाश केला असुन डॉ. या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळेपर्यंत माघार नाही. ताकदीने लढू, या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नक्कीच लक्ष घालतील, असा विश्वासही सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

FAQs

1. सुप्रिया सुळे यांनी कोणत्या प्रकरणात भेट दिली?
त्या मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या, ज्यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली होती.

2. सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय आवाहन केलं?
त्यांनी फडणवीसांना कोणालाही क्लीन चीट न देण्याचं आणि निष्पक्ष तपास करण्याचं आवाहन केलं.

3. हे प्रकरण कुठे घडलं होतं?
हे प्रकरण फलटण शहरात घडलं असून, मृत डॉक्टर महिला एका सरकारी रुग्णालयात कार्यरत होत्या.

4. या प्रकरणाचा राजकीय संदर्भ काय आहे?
आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला जाब विचारला आहे.

5. सुप्रिया सुळे यांनी पुढील कारवाईबाबत काय सांगितलं?
त्या म्हणाल्या की, “डॉक्टर तरुणीला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com