Suraj Chavan News : सुरज चव्हाण यांच्यासह नऊ जणांना अटक अन् लगेच सुटका! किरकोळ मारहाणीचे कलम लावल्याचा आरोप

Suraj Chavan and 8 Others Released Amid Allegations of Political Pressure on Police : या प्रकरणात अकरा जणावर गुन्हा दाखल असून या पैकी नऊ जणांची अटक व सूटका झाली आहे. दोघांचा शोध सुरु आहे.
Suraj Chavan  Arrested News
Suraj Chavan Arrested NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत छावाचे विजय घाडगे पाटील यांनी पत्ते भिरकावले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या सुरज चव्हाण व इतर कार्यकर्त्यांनी घाडगे व त्यांच्यासोबत आलेल्या तीन ते चार जणांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी सुरज चव्हाण यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा नोंद आहे. यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली. परंतु किरकोळ मारहाणीची कलमं लावल्याने लगेच त्यांची जामीनावर सुटकाही झाली.

पोलीसांच्या या कारवाईवरून छावा संघटनेसह विरोधकांनी संताप व्यक्त करत राजकीय दबावामुळे किरकोळ कलमं लावून मारहाण करणाऱ्या (NCP) राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण (Suraj Chavan) व इतर कार्यकर्त्यांचा बचाव केल्याचा आरोप केला आहे. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे शेतकरी आघाडीचे नेते विजयकुमार घाडगे यांना रविवारी झालेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आज (ता. 23) विवेकानंद ठाण्याच्या पोलिसांना शरण आले. त्यांची पोलिसांनी अटक दाखवत जामिनावर सूटका केली.

या प्रकरणात अकरा जणावर गुन्हा दाखल असून या पैकी नऊ जणांची अटक व सूटका झाली आहे, तर दोघांचा शोध सुरु आहे. (Fir) गंभीर मारहाण झाल्यामुळे सुरज चव्हाण व इतर हल्लोखोरांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी 307 कलम लावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मुंबईत विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभागृहातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला होता.

Suraj Chavan  Arrested News
Suraj Chavan Arrested : मोठी बातमी! मारकुट्या सूरज चव्हाणला अटक, पोलिसांनी फास आवळण्याच्याआधीच शरणागती

या संदर्भात कोकाटे यांच्यावर कारवाई करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत लातूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे शेतकरी आघाडीचे नेते विजयकुमार घाडगे यांनी निवेदन दिले होते. तसेच कृषीमंत्र्यांचा निषेध म्हणून त्यांच्या टेबलावर पत्तेही उधळले होते. या घटनेनंतर काही वेळातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी घाडगे यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने चव्हाण यांचा राजीनामाही घेतला होता.

Suraj Chavan  Arrested News
Latur मध्ये Chhava Sanghatana Vs NCP Ajit Pawar गट भिडले, Suraj Chavhan, Sunil Tatkare अडचणीत ?

या प्रकरणात घाडगे यांच्या फिर्यादीवरुन विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण यांच्यासह लाला सुरवसे, शुभम रेड्डी, अमित क्षीरसागर, ताज शेख, अभिजित सगरे पाटील, सिद्धीक मुल्ला, अहमद शेख, वसिम मुल्ला, रवि धुमाळ व राजू बरगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात पोलिसांनी लाला सुरवसे, अभिजित सगरे पाटील, अमित क्षीरसागर, राजू बरगे, सिद्दीक मुल्ला, वसिम मुल्ला, शुभम रेड्डी, रवि धुमाळ यांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली. त्यानंतर आज सूरज चव्हाण हे पोलिसांना शरण आले. त्यांना अटक करून नंतर पोलिसांनी सोडून दिले.

Suraj Chavan  Arrested News
Suraj Chavan: 'मारकुट्या' सूरज चव्हाणला 24 तासांच्या आतच दोन मोठे दणके; अजित पवारांच्या आदेशानंतर आता पोलिसांनी कठोर पावलं उचलली

पहाटेच शरण, अटक अन् जामीनावर सुटका..

दरम्यान, सूरज चव्हाण यांच्यावर छावा संघटनेचे कार्यकर्ते नजर ठेवून आहेत. हे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे सूरज चव्हाण पोलिस ठाण्यात दिवसा येणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. बुधवारी पहाटे साडेचार वाजता गाडीतून विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात त्यांना आणण्यात आले. पोलिसांना याची अगोदरच माहिती कळाली होती. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकारी साडेतीन- चार वाजल्यापासूनच पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. चव्हाण आल्यानंतर त्यांना अटक करुन तातडीने जामिन मंजूर करीत त्यांची सूटका करण्यात आली. एक दीड तासात ही प्रक्रिया पूर्ण करून सूरज चव्हाण यांनी लातूर सोडले.

Suraj Chavan  Arrested News
NCP News : जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न! छावाच्या जिल्हाध्यक्षासह चार जणांवर गुन्हा दाखल

पोलीसांनी लावली ही कलमं..

सुरज चव्हाण यांच्यासह इतर आरोपींवर पोलीसांनी मारहाणीची किरकोळ कलमं लावल्याचा आरोप केला जात आहे. पोलीसांनी या सर्वांवर कलमं भारतीय न्यायसंहिता (बी.एन.एस) 2023 118(1),115(2),351(2), 351(3),189 (2),191(2), 190 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे 135 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com