Chhawa Sanghatna : सूरज चव्हाणांना प्रमोशन देताच ‘छावा’ खवळली; ‘अजितदादांना हे परवडणारे नाही, सुनील तटकरेंचा सत्तेचा माज उतरवू’

Suraj Chavan Pramotion in NCP : ह्या वीस-वीस दिवसांत असं काय घडलं की सूरज चव्हाण यांना प्रमोशन देऊन राज्याचे सरचिटणीसपद देण्यात आले, असा सवाल विजय घाडगे यांनी उपस्थित केला.
Suraj Chavan-Vijay Ghadge
Suraj Chavan-Vijay GhadgeSarkarnama
Published on
Updated on

Latur, 14 August : छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांना मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना पक्षाने प्रमोशन दिले आहे. सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे छावा संघटना आक्रमक झाली आहे. खुद्द घाडगे यांनी सूरज चव्हाणाला सरचिटणीस करणे राष्ट्रवादीला आणि अजित पवारांना परवडणारे नाही, असा असा इशारा दिला आहे.

लातूरच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यापुढे पत्ते फेकून तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करणारे छावा संघटनेचे विजय घाडगे आणि त्यांच्या सहकऱ्यांना सूरज चव्हाण व इतरांनी बेदम मारहाण केली होती, त्यानंतर छावा संघटनेकडून तटकरे आणि चव्हाण यांच्या विरोधात छाव संघटनेने तीव्र आंदेालन केले होते.

विजय घाडगे यांना मारहाण करणारे चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, त्याच चव्हाण यांना पक्षाकडून प्रमोशन देण्यात आले असून पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे छावा संघटनेकडून तीव्र संताव व्यक्त करण्यात येत आहे. घाडगे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ही शेतकरीविरोधी आहे, हे त्यांनी आज दाखवून दिले आहे.

अजित पवारांना भेटल्यानंतर त्यांनी इथून पुढे सूरज चव्हाण आणि पक्षाचा काही संबंध असणार नाही. पक्षाच्या मूल्यांचे आणि धोरणाचे कोणी उल्लघंन करणार असेल तर अशा कार्यकर्त्यांना आम्ही पक्षात स्थान देणार नाही, असे आम्हाला सांगितले होते. पण ह्या वीस-वीस दिवसांत असं काय घडलं की सूरज चव्हाण यांना प्रमोशन देऊन राज्याचे सरचिटणीसपद देण्यात आले, असा सवाल घाडगे यांनी उपस्थित केला.

Suraj Chavan-Vijay Ghadge
Vidharbha Politic's : नाना पटोलेंना मोठा झटका; गोंदियानंतर भंडारा जिल्हा बॅंकेचेही दार नानांसाठी बंद, राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांचे वर्चस्व

शेतकऱ्यांच्या पोरांना मारहाण करणाऱ्यांना तुम्हाला जर पोसायचे असेल तर राष्ट्रवादीने सांगावं की आम्हाला गुंडांना पोसायचे आहे. अजित पवारांना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना निवदेन देणाऱ्यांना तुम्ही असंच मारणार आहात का. सूरज चव्हाण यांना सरचिटणीसपद देणे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अजित पवार यांना परवडणारे नाही. सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांना पद देऊन सत्तेचा जो माज दाखविला आहे, तो माज आम्ही शेतकऱ्यांची पोरं उतरविल्याशिवाय राहणार नाही, असार इशाराही घाडगे यांनी दिला.

Suraj Chavan-Vijay Ghadge
Dada Bhuse Relatives News : दादा भुसेंचे भाचेजावई माजी आयुक्त पवारांना ईडीची कोठडी; वकिलांचा मोठा दावा, ‘शिवसेना-भाजपच्या वादातून हे घडविले...’

नांदेडमधील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. शब्दाचे पक्के असणारे अजितदादांनी पक्षातून हाकलून दिलेल्या सूरज चव्हाण यांना अवघ्या पंधरा दिवसांत सरचिटणीस केले. शेतकरी पुत्राला मारहाण करणाऱ्या चव्हाण यांना अजितदादांनी मोठे पद दिले. पण अजितदादा तुम्हाला स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक सोपी जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com